लाडगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेअतर्गतं आठ गावासाठी एकुण दहा कोटींचा निधी.... एकुण निधीचे नऊ हजार सभासदानां होणार वाटप

0
BNN
सागर देवकर
 लाडगाव ,औरंगाबाद


 वैजापुर तालुक्यातील लाडगाव जिल्हा मध्यवर्ती  बॅकेस पिक विमा वाटपासाठी 3300 सभासदासाठी तीन कोटी  पन्नास लाखांचा निधी मका, भुईमूग,  सोयाबीन, मुग, व बाजरी पिकांसाठी  मंजूर झाला असुन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 4651 सभासदासाठी तीन कोटी दहा लाखांचा निधी उपलब्ध होऊन शेतकर्याच्या खात्यात वर्ग करण्यात येत असून महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आठ गावातील गोयगाव,

 लाडगाव, कापुसवाडगाव, वाजंरगाव, नादुरढोक, सावखेडगंगा, बाभुळगावगंगा, भालगाव आदी गावातील   विविध कार्यकारी सेवा सहकारी  सोसायटी,  बॅंका यांच्या ऑनलाईन यादीप्रमाणे 1101 लाभार्थी सभासदासाठी तीन कोटी 36 लाखांच्या कर्जमाफिचा लाभ शेतकर्यानां होणार असून संबंधित यादी गावानिहाय  सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, तलाठी आदीच्या सहकार्याने प्रसिद्ध करण्यात आल्या असुन लाभार्थी शेतकर्यानी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण बॅकेत अथवा जवळील केंद्रावर ऑनलाईन करून घ्यावे व ज्या सभासदानी आपले कर्जखातेसाठी एटीएम कार्ड उपलब्ध झाले असून ते अद्याप नेले नाही त्यांनी लवकरच घेऊन जावे असे आवाहन लाडगाव बॅकेचे इन्स्पेक्टर  संजय जाधव यांनी केले आहे

रविवारीहि बॅकचे कामकाज सुरूच ...कर्जमाफि व पिकविमा,  धारक सभासदाची संभाव्य गर्दी टाळण्यासाठी रविवारीहि बॅकचे कामकाज सुरळीत सुरु होते असे बॅकचे इन्स्पेक्टर संजय जाधव यांनी सांगितले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top