अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जळगाव जामोद तालुका बैठक संपन्न

0


शिवदास सोनोने 
बुलढाणा
B. N. N

 जळगाव जामोद येथील संत श्री गजानन महाराज मंदिराच्या मागील प्रांगणात आज दिनांक 8-3- 2020 रोजी दुपारी एक वाजता बैठक घेण्यात आली वरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख हे होते तर प्रमुख उपस्थितीत नियोजन समिती उपाध्यक्ष अभिमन्यू भगत, जिल्हाध्यक्ष योगेश हजारे, जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम वानखडे, जिल्हा सचिव नितेश मानकर, जिल्हा सहसचिव मोहन हिवाळे यांची उपस्थिती होती वरील बैठकीत जळगाव शहर तालुका व जिल्हा कार्यकारिणीतील तसेच पदवीधर, वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या वरील नियुक्ती मध्ये बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम वानखडे तर जिल्हा उपाध्यक्ष मनीष ताडे, जिल्हा संघटक अश्विन राजपूत, पदवीधर पत्रकार संघ जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत जाधव, वृत्तपत्र विक्रेता संघ जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार भड, तालुकाध्यक्ष गोपाल अवचार, तालुका कार्याध्यक्ष श्रीधर आवेकर, तालुका कार्याध्यक्ष अशोक टाकळकर, तालुका उपाध्यक्ष दत्तू दांडगे, तालुका उपाध्यक्ष अनिल भगत, तालुका संघटक शिवदास सोनोने, तालुका सहसंघटक विजय वानखडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख अमर तायडे, तालुका प्रेस फोटोग्राफर सुरेश मानकर, जळगाव जामोद शहराध्यक्ष अमोल भगत, जळगाव जामोद कार्याध्यक्ष अजय गिरजापुर, जळगाव जामोद  शहर सचिव मंगेश राजनकार, वृत्तपत्र विक्रेता जळगाव जामोद तालुकाध्यक्ष रवींद्र ढगे,
ह्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या वरील नियुक्त्या जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांनी केल्या

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल अवचार यांनी केले. प्रास्ताविक अभिमन्यू भगत यांनी केले ह्यावेळी अश्विन राजपूत व खामगाव तालुका अध्यक्ष चरखे यांनी मनोगत व्यक्त केले वरील कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगेश हजारे यांनी संघटने मध्ये नवीन झालेल्या नियुक्त्या करून सर्वांना शुभेच्छा दिल्या व बुलढाणा जिल्ह्यात संघटना तेराही तालुक्यात लवकरच आपल्या कार्यकारिणी जाहीर करील व जिल्ह्यात संघटना कुठल्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास सर्वप्रथम धावून येईल यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्षकैलास बापू देशमुख यांनी संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकला व संघटनेच्या सदस्याला ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा करून  देण्यात आली आहे संघटना पदवीधर वृत्तपत्र विक्रेता, ब्लड, महिला मंच, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असून संघटनेच्या कुठलेही पत्रकारांनी सर्व पत्रकारांना सोबत घेऊन कार्य करावे तसेच लवकरच वृत्तपत्र विक्रेता करणारे सर्व  पत्रकारांना कामगार म्हणून दर्जा मिळावा म्हणून कामगार मंत्री यांची भेट घेऊन लवकरच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी निवेदन देतील 1मे महाराष्ट्र दिन पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात येईल असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला 8 मार्च जागतिक महिला दिन असल्यामुळे RC24न्युज च्या वृत्तनिवेदिका कुमारी नेहा सूर्यवंशी व कु अशाकीय आलम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

वरील कार्यक्रमाला जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळ जवळ 30 ते 40 पत्रकार बंधू हजर होते तर ह्यावेळी खामगाव तालुका अध्यक्ष व तालुका कार्यकारणीतील पत्रकार बंधू हजर होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक टाकळकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लियाकत खान, गोपाल अवचार, दत्ता बोरसे, आत्‍माराम इंगळे, मधु ढगे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top