विवाह आटोपून परत येतांना दोन मोटारसायकलचा समोरासमोर अपघातात दोघांचा मृत्यू

0

B.N.N
अरुण हिंगमिरे
देवळा, नाशिक

देवळा तालुक्यातील मेशी महालपाटणे रस्त्यावर गिरणा उजवा कालव्याजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.गुलाब राजाराम सोनवणे (वय ४२) रा.रणादेवपाडे व जनार्दन अर्जुन देवरे रा दहिवड शेलदर मळा (वय-४२) मृत झालेल्यांची नावे आहेत. तर दोन्ही दुचाकींवर असलेल्या महिला व दोन लहान मुलांचा जखमी झाले आहे. दोन्ही मोटारसायकल वरील दुचाकीस्वार विवाह आटोपून परतत असतांना हा अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


जनार्दन सोनवणे रा. दहिवड हे बागलाण तालुक्यातील अमरावतीपाडे येथून विवाह आटोपून पत्नी उज्वला (वय ३८)  यांच्यासह परतत असतांना गिरणा उजवा काळव्याजवळ समोरुन येनारे गुलाब सोनवणे यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. गुलाबच्या दुचाकीवर त्याची पत्नी सरला( वय३५), मुलगा किरण (वय १२) व भाचा कार्तिक निलेश पवार (वय ४) जखमी झाले.


अपघातात दोघां दुचाकी चालविणाऱ्याना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. जखमींना मेशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. देवळा ग्रामिण रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वरील घटनेचा अधिक तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार अशोक धोक्रट हे चौकशी करत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top