नांदगाव येथे अनोखा उपक्रम राबवून शाळेत साजरी करण्यात होळी.

0

B.N.N 
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
               
 नांदगाव येथील  सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून आवारातील झाडांचा पालापाचोळा ,प्लास्टिक व कागद यापासून तयार केलेल्या होळीचे दहन करून होळी हा सण साजरा केला. यात मुलांनी वाईट रूढ़ी परंपरा, अनिष्ट प्रथा, लोभ, द्वेष, मत्सर, राग, आळस, मीपणा, गर्व, क्रोध, अंधश्रद्धा,अहंकार, वाईट गुण, यांचे तक़्ते बनवून त्यांचेही होळीत दहन करुण समाजातील या सर्व वाईट गोष्टी समूळ नष्ट व्हाव्यात हा संदेश  देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक.सावंत सरांनी याद्वारे होळीतील गोष्टी ज्या पद्धतीने समूळ नष्ट होतात, त्याच पद्धतीने आपल्या मधील वाईट गोष्टी होळीच्या माध्यमातून समूळ नष्ट काराव्यात हा संदेश दिला. या वेळी संस्थेचे प्रशासन अधिकारी पि.बी गुप्ता तसेच खरोटे सर उपस्थित होते.   


याप्रसंगी संस्थेचे चेअरमन.सुनिलकुमारजी कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, पदाधिकारी महेंद्र चांदिवाल, या सर्वांनी वरील उपक्रमाचे कौतुक केले.
 वरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक सिद्धार्थ जगताप, अभिजित थोरात, ईश्वर फणसे, विजय जाधव, धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, जयश्री चोळके, अनिता पवार, वैशाली शिंदे, मीना सुरळकर, शालिनी निकम, आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top