B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
नांदगाव तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यसंदर्भात कुठलीही आर्थिक अडचण उदभवल्यास शासकीय मदतीची वाट न पाहता मला कळवा, मी स्वतःच्या खिश्यातून पैसे खर्च करून ती समस्या सोडवेन.! असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
व्यासपीठावर तहसीलदार योगेश जमदाडे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी,क्षनांदगाव न.पा.मुख्याधिकारी श्रिया देवचक्के, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ससाणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे हे होते.
'कोरोना' व्हायरसचा प्रादुर्भाव चीन वगळता इतर ही देशात ही पसरू लागल्याने भारतातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.मात्र आजपर्यंत एकही रुग्ण आढळला नसला तरी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जात आहेत,आणि याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणेची तातडीने बैठक आमदार श्री.कांदे यांनी आज घेतली.या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आ.कांदे यांनी कोरोना व्हायरस संदर्भात अनेक पैलू उलगडून सांगितले, तर यावेळी बोलताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहन बोरसे यांनी सांगितले की,कोरोना व्हायरस चा विषाणू हा यापूर्वी ही भारतात येऊन गेला आहे.मात्र त्यावेळी त्याचे नाव वेगळे होते,अन आज वेगळे.! मात्र लक्षण सारखेच असल्याने हा तोच व्हायरस असल्याचे निदान होत आहे.१५ वर्षाच्या आतील व ६० वर्षाच्या वरील तसेच मधुमेह पिडीत,अनेक शस्त्रक्रिया केलेले व्यक्ती यांना या व्हायरसचा अधिक प्रादुर्भाव होऊ शकतो असे डॉ.बोरसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यशवंत पाटील, सरपंच प्रमोद भाबड, सागर हिरे, अय्याज शेख, शिवसेनेचे तालुका प्रमुख किरण देवरे,क्षसेतू संचालक सचिन निकम, नायब तहसीलदार आर.एम.मरकड, संतोष डुंबरे, सागर खरोटे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पंकज देवकते, विजय इप्पर, यांच्यासह प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.