कोरोना जनजागृती सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते आपल्या शोले दुचाकीसह उतरले रस्त्यावर : शोले स्टाईल दुचाकीच्या माध्यमातून दीपक चव्हाण करणार कोरोनो जनजागृती

0
BNN
Sangli

अँकर : सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आजपासून आपल्या शोले स्टाईल दुचाकीवरून कोरोना जनजागृती सुरू केली आहे. आज जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत दीपक चव्हाण यांनी आपल्या शोले दुचाकीचा कोरोनो जनजागृती शुभारंभ केला. या शोले दुचाकीवर गब्बर सिंग, जय बसंती बिरु यांच्या प्रतिकृती कोरोनोबाबत संदेश देत आहेत. याचबरोबर जिल्हा प्रशासनाचा कोरोनॉबाबतचा जनजागृती संदेशही याद्वारे देण्यात आला आहे.


  दीपक चव्हाण यानि यापूर्वीही अनेक आपत्ती तसेच शासनाच्या योजनांचे शोलेस्टाईल प्रबोधन आणि जनजागृती केली आहे. आता दीपक चव्हाण यांनी कोरोनो विषाणू पासून जनतेने कसे दूर राहायचे तसेच काय काळजी घ्यावी याबाबतची प्रबोधन आपल्या शोले दुचाकीवरून सुरू केले आहे. दीपक चव्हाण यांचे हे 36 वे प्रबोधन आहे. आज दिपकचव्हान यांच्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आणि सिव्हिल सर्जन संजय साळुंखे, जिल्हा माहिती अधिकारी सौ वर्षा पाटोळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजपासून सांगली शहरात दीपक चव्हाण यांचा कोरोना जनजागृती शोले स्टाईल रथ प्रबोधन करत फिरणार आहे. विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांनी चित्रपटाच्या चालीवर कोरोना प्रबोधन गितही तयार केले असून ते गीत सोशल मीडियावर लोकप्रिय बनले आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top