गल्लेबोरगाव जवळ अपघातात एक जण जागीच ठार

0
BNN
बाबासाहेब दांडगे
गल्लेबोरगाव - औरंगाबाद


गल्लेबोरगाव-
धुळे  - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव जवळ पळसवाडी शिवारात एस्सार पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (दि. 17) दुपारी दोन वाजेच्या सुमारास  हिरो स्कुटी क्रमांक एम एच 20 ई एम 8479 वर औरंगाबाद हून कन्नड कडे जात असलेले शिक्षक अशोक त्र्यंबक घोरपडे ( वय 48) यांना पाठीमागून येणारी धुळे आगाराची बस क्रमांक एम एच 20 बी एल 4131 हीने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागेच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक घोरपडे हे औरंगाबाद हून कन्नड कडे जात होते, त्यांनी कन्नड-औरंगाबाद महामार्गावर गल्लेबोरगाव जवळील एस्सार पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून कन्नड कडे निघाले असता औरंगाबाद हून धुळया कडे जाणार्या राज्य परिवहन मंडळाच्या बस ने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
बसने त्यांना काही अंतरावर फरफटत नेले.
या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली, रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
ते अंधानेर( ता. कन्नड) येथील शाळेवर कार्यरत होते.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव, पोलिस काॅन्सटेबल अमर आळंजकर व पोलीस मित्र शरद दळवी यांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत महामार्गावरील  वाहतुक सुरळीत केली.

खुलताबाद पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून बीट अमलदार वाल्मिकराव कांबळे पुढील तपास करत आहेत.
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सध्या कन्नड ते औरंगाबाद दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
यामुळे अनेक ठिकाणी महामार्गावर एकेरी वाहतुक सुरू असून या अपघाताच्या बाजूला सुध्दा एकेरी वाहतुकच सुरू होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top