माणुसकीयुक्त प्रेम हाच जगण्याचा आधार-डॉ नामदेव महाराज शास्री

0
B. N. N

शिवुर या ठिकाणी श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रम आयोजित तुकाराम महाराज बीजोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा होत आहे दि ४ तारखेला  रामनाथ देव बाबा यांच्या हस्ते ध्वजपुजन होऊन सुरवात झाली

 ,नंतर दिपक महाराज घोडेकर यांचे किर्तन झाले .दुपारी काशिनाथ शास्री याची भागवत कथा झाली .दुपारी ४ वा  भगवानगडाचे मंहत डॉ न्यायाचार्य नामदेव महाराज शास्री यांचे आगमन व्यासपीठावर झाले .



या वेळी ते बोलत होते की ,ईश्वर प्रसादाने मिळालेले प्रेम हेच खरं जिवन असतं .प्रासादिक प्रेमाचा योग हा जीवनातील भोग असतो .प्रेम एक विश्वास आहे .प्रेमाची तहान ही प्रेमानेच भागते .संताचं प्रेम हे व्यापक होतं ,त्यांच्या प्रेमाला मर्यादा नाही .मर्यादा युक्त प्रेम करतो तो माणुस दिसायला शहाणा असला तरी तो अज्ञानीच असतो.वारकरी  संतानी जगाला प्रेमाचा ,सर्वधर्मसमभावाचा आणि शाश्वत आनंदाचा संदेश दिलेला आहे असे प्रतिपादन शास्त्री महाराज यांनी केले


,यावेळी त्यांच्यासमवेत अमेरिकेहुन भारतात आलेले भगवानगडाचे भक्त बाँबी आणि बोरा  यांनी ही यावेळी आश्रमाला भेट दिली .भारतीय संस्कृती पद्धतीने त्यांचे स्वागत बी बी शिंदे सर व श्रीमती सिताबाई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले .भारतीय संस्कृती व महाराष्ट्रातील ज्ञानोबाराय हे संत मानवी जिवनाचे मार्गदर्शक व शांततेचे संदेश देणारे आहेत असे विचार बाँबी यांनी मांडले.प्रकाश घोडके सर यांनी काढलेल्या रांगोळीतुन वारकरी प्रतिमा त्यांचे कौतुक केले .

यावेळी ,गंगाधर महाराज कवडे ,ज्ञानेश्वर महाराज मधाने ,सारंगधर महाराज भोपळे ,भगवान म ठुबे ,नवनाथ म जाधव ,गणेश म जाधव ,गणेश म बावचे ,भागीनाथ दादा मगर ,नितीन चुडीवाल ,बबन तात्या जाधव , शिवाजीराव आढाव ,  पोपट तात्या ,रामभाऊ जाधव ,गोरख साळुंके , व परीसरात भाविक उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top