BNN
बाबासाहेब दांडगे
तेलवाडी - औरंगाबाद
तेलवाडी - आज जागतिक महिला दिन या दिनी विविध क्षेत्रात विशेष कार्य करणार्या महिलांचा सत्कार होत असतो.
या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महामार्ग पोलिसांनी सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर कन्नड तालुक्यातील तेलवाडी तांडा येथे पुष्पगुच्छ व पेढे देऊन महिलांचा सत्कार केला.
यावेळी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. नामदेव चव्हाण यांनी उपस्थितांना येणार्या होळी सणानिमित्त अपघात होऊ नये म्हणून हेल्मेट, सिटबेल्ट व वाहतूक नियमांचे पालन करावे जेणेकरून अपघात होणार नाहीत त्याकरिता सावकाश वाहन चालवण्याचे आवाहन करत असताना होळी हा सण साजरा करताना *मद्यपान करून वाहन चालवू नये आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेतही महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. नामदेव चव्हाण यांनी दिले.*
हा कार्यक्रम औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, अपर पोलिस अधीक्षक श्री. गणेश गावडे, महामार्ग पोलिस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपूरकर, पोलिस निरीक्षक श्री. मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.