ठकुबाई वर्पे यांचे वयाच्या१०५ व्या वर्षी निधन
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील धनगर समाजातील वयाने सर्वात जष्ट असलेल्या ठकुबाई गिरजीनाथ वर्पे यांचे गुरुवारी दुपारी ३.३० वाजता वयाच्या१०५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ठकु आजींच्या निधनाची बातमी समजताच येथील समस्त धनगर समाजावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात सहा मुले, दोन मुली, जावाई, २६ नातु व नाती, पंतु ,पंती असा परिवार असून त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी वर्पेवस्ती महादेव रोड येथे त्यांच्या शेतात सकाळी नऊ वाजता होणार आहे, असे त्यांच्या परिवाराकडून कळविण्यात आले आहे.