कोरोणा आजाराचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून शाळा, महाविद्यालयासह आठवडे बाजार ३१ मार्च पर्यंत बंद

0
.

B.N.N

अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक


 नांदगाव तालुक्यातील सर्व शाळा धार्मिक यात्रोत्सव आणि आठवडे बाजार ३१ मार्च पर्यंत बंद ठेवणे बाबत नगरपालिका व ग्रामपंचायतींना शासन निर्णयानुसार आदेश देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्यातील कोरोणा विषाणू (कोव्हिड१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी दि.१४ व १५ मार्च रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दि.१६ मार्च रोजी पाठवलेल्या पत्रा नुसार महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत क्षैत्रातील सर्व धार्मिक यात्रोत्सव, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालय त्याचप्रमाणे सर्व आठवडे बाजार दि.३१ मार्च पर्यंत बंद ठेवणे बाबत दिनांक सोळा मार्च रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी,



 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आ. सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली नांदगावचे तहसीलदार योगेश जमदाडे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ससाणे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहन बोरसे आणि न.पा. च्या मुख्याधिकारी श्रिया देवचक्के यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार तालुक्यातील मनमाड व नांदगाव नगरपालिका क्षैत्रातील व ग्रामीण भागातील आठवडे बाजार, धार्मीक यात्रोत्सव, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेंसह सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा त्याचप्रमाणे आश्रम शाळा तात्पुरत्या स्वरूपात दि. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवणे बाबत निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहे.
त्यानुसार मंगळवार दि.१६ पासून तालुक्यातील ग्रामीण भागातील आठवडेेे बाजार बंद राहील याबाबत गावागावात दवंडी देऊन त्याचप्रमाणे चौकाचौकात फलक लिहून सूचना देण्यात आल्या आहे.
यावेळी नांदगावचे नगराध्यक्ष राजेश कवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तेज कवडे, पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब हिरे, उप सभापती नाईकवाडे त्याचप्रमाणे सुभाष कुटे, सुमनताई निकम, मधुबाला खिरडकर, अर्चना वाघ हे सदस्य तसेच शिवसेना नेते विलास आहेर, तालुका प्रमुख किरण देवरे युवा सेना तालुका प्रमुख गुलाब चव्हाण, सागर हिरे गुलाब भाबड राजाभाऊ जगताप यांच्यासह तालुक्यातील ठिकठिकाणचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अरुण हिंगमीरे
बिंदास मिडीया
नांदगाव, नाशिक

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top