नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर वर प्लास्टिक बंदी मोहिमेत दंडात्मक कारवाई आणि प्लास्टिक जप्त

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नाशिक

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील ढेकू जातेगाव बोलठाण रोहिले इत्यादी गावांमध्ये सोमवार दि. ९ मार्च रोजी होळीच्या दिवशी नांदगाव पंचायत समितीच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कार्यवाही करत तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई करुण दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या, तर बाकी सर्व किराणा तसेच इतर दुकाने आणि आस्थापनांना प्लास्टिकचा वापर बंद करणे बाबत सूचना तसेच नोटीस बजावण्यात आल्या या कार्यवाही मध्ये जातेगाव येथील कचरू विश्वनाथ व्यवहारे यांच्यावर प्लास्टिक बंदी कायद्या नुसार दंडात्मक कारवाई करतांंना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

या कार्यवाही मध्ये नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.एल. खताळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सागर वाग, विस्तार अधिकारी डी.एस.मांडवडे, ग्रामसेवक भगवान जाधव, यांच्यासह स्थानीक ग्रामपंचायत कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. तर बोलठाण येथील ग्रामपंचायतने आगोदरच जनजागृति मोहिम राबवुन सर्व दुकाने आणि  आस्तापनांना प्लाष्टिकचा वापर बंद करणे बाबत नोटिस बजावलेल्या असल्याने तेथे दुकानांची झाडाझडती केली असता प्लास्टिक अढळुन आले नाही. तर रोहिले आणि ढेकु येथील किराणा दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

 मे 2020 पर्यंत प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र करण्याचा राज्य सरकारचा निर्धार असल्याचे सहा महिन्यापूर्वी सर्व दुकाने कार्यालय आस्थापना त्यांच्यावर केलेल्या कार्यवाही आणि जनजागृती ने प्लास्टिकच्या दुष्परिणामांं बाबत  लोकांची मानसिकता हळूहळू रुजूलागली होती. परंतु मध्यंतरी निवडणुकीच्या काळात प्लास्टिक वरील कारवाई थंडावली आणि बाजारपेठेमध्ये पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्यांचे डोकेवर काढले मधल्या काळात कापडी कागदी पिशव्यांंचा वापर बर्यापैकी सुरु झाला होता. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये प्लास्टिक बंदी वरील कार्यवाही थंडावल्याने  वरील मोहिमेचे उद्दिष्ट निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे.

 
                          *प्रतिक्रिया*
१)  दुकाने आणि आस्थापनांवर कार्यवाही मर्यादित न ठेवता प्लॅस्टिक पिशव्यांचे व थर्मोकोलच्या उत्पादन आणि विक्री तसेच वापरावर ही निर्बंध आणणे आवश्यक आहे.
विजय पाटील
तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस- नांदगाव

२) प्लास्टिक बंदी करणे आवश्यक असून त्यासाठी शासनाने किरकोळ दुकाने आणि आस्थापनांवर कार्यवाही करण्याअगोदर प्लास्टिक निर्मितीचे कारखाने बंद करणे आवश्यक आहे. जो पर्यंत प्लास्टिक निर्मिती सुरु आहे, तो पर्यंत बंदी कागदावरच राहील.
अमित नहार
अध्यक्ष- के.सी.नहार
पतसंस्था बोलठाण

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top