B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
नांदगांव सालाबाद प्रमाणे यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी सारनाथ बुद्ध विहार येथे बैठक घेण्यात आली होती त्यात युवा पिढीला या वर्षी अध्यक्ष पदाचे स्थान मिळावे म्हणुन तरुणांनी प्रस्थाव मांडला होता त्यात सर्व जेष्ठ मंडळींनी मान्य करून जमलेल्या आंबेडकरी अनुयायांनी अध्यक्ष पदासाठी ऋषी जाधव यांची अध्यक्षपदी सर्वांच्या अनुमतीने निवड करण्यात आली.
त्या नंतर सर्वानुमते उपाध्यक्षपदी विशाल अडकमोल, कार्याध्यक्ष कुणाल आहेर, सचिव आण्णासाहेब निकम, खजिनदार साहेबराव बनसोडे, यांची नियुक्ती करण्यात आली. या नंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बैठकिची सांगता करण्यात आली.