B.N.N
अरुण हिंगमीरे
नस्तनपुर, नांदगाव
शनिदेवाच्या साडेतीन शक्तीपिठापैकी एक संपूर्ण शक्ती पिठ असलेल्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपुर येथील शनेश्वर देवस्थानच्या ठिकाणी स्व.जयंतराव ससाणे यांच्या द्वितीय स्मृति दिनानिमित्त आज शनीप्रदोषाचे औचित्य साधून देवाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो शनिभक्तांसाठी साबुदाणा खिचडी व फलाहाराचे वितरण चाळीसगाव येेेथील कैलास सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी माजी आमदार व देवस्थानचे जनरल सेक्रेटरी अनिल आहेर इतर मान्यवर उपस्थित होते.
जयंतराव ससाने यांनी क वर्ग पर्यटन स्थळ करण्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री व विद्यमान अन्न व औषध आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून श्री शनिमंदिराच्या विकास कामांना चालना देण्यामध्ये मोलाचे योगदान व मार्गदर्शन केल्याने कमी वेेळेत शनिदेवाच्या मंदिरासह भक्तनिवास तसेच परिसराचे सुशोभीकरण व इतर कामे उतकृष्ट करण्यास मदत झाली असे माजी आमदार अनिल आहेर यांनी सांगितले, यावेळी ससाणे यांच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते व हजारो शनिभक्त या स्मृतीदिनाच्या सोहळ्यास उपस्थित होते.