B.N.N
अरुण हिंगमिरे
जातेगाव, नांदगाव
नाशिक
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील विद्युत सहाय्यक (वायरमन) हिराजी झाकरोजी बैठेकर (वय२८) यांचे रविवार दि.८ रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
शनिवारी दि.२९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे पडधाडी घाटात मुख्य विज वाहिण्यांचे पोल उखडून पडल्याने रविवारी दिवसभर बैठेकर यांच्यासह त्यांचे सहकार्यांनी नवीन पोल उभे करुन रात्री नऊ वाजता विज पुरवठा सुरळीत करून घरी गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बोलठाण येथे प्रथमोपचार करुन त्यांना तातडीने औरंगाबाद येथे अधिक उपचारासाठी नेले असता, त्यांच्या हृदयाच्या सहा रक्तवाहिन्या बंद असल्याचे निदर्शनात आल्याने तातडीने त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी अधिक होत असल्याने त्यांना सिग्मा हॉस्पिटल या दवाखान्यातच ठेवण्यात आले होते परंतु रविवारी आठव्या दिवशी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
बैठेकर सन २०१५ मध्ये विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती झाली होती, तर त्यांना २०१७ साली कायमस्वरूपी नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यांचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, सहा महिण्याची मुलगी, एक भाऊ एक बहिण असा परिवार असून त्यांचा अतिशय मनमिळाऊ स्वभाव असल्याने विज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह घाटमाथ्यावरील नागरिकांनी त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्यावर त्यांच्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खारी या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी कळविले आहे.