माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार राज्यस्तरीय गरुडझेप पुरस्काराने सन्मानित

0

B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक

नांदगाव तालुक्यातील नागापुर येथील माजी सरपंच, तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सयाजी पवार यांनामाजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय गरुडझेप पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

व्यवसाय तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजवले बद्दल त्यांंच्या कार्याची दखल घेत वरील पुरस्काराने पवार यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार  ईगल फाउडेंशन सांगली यांच्या वतीने  कोल्हापूर येथील राजे शाहु महाराज स्मारक सभागृह मध्ये पार पडला. माजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर यांच्या हस्ते या  पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर,  प्रा.तौहिद मुजावर, ईगल फाउडेंशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर,भगिरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती धनंजय महाडीक, शेखर सुर्यवंशी, कॅप्टन गणपराव घोडके यांच्या सह ईगल फाउडेंशनचे सभासद पदाधिकरी उपस्थित होते. या या वेळी राज्यभरतुन आनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी  उपस्थित होते. पवार यांना गरुडझेप पुरस्कार जाहीर झाल्यापासून जिल्हाभरातुन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रापासून सर्वसामान्य नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top