B.N.N
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नाशिक.
नियमित वापरण्यात येणाऱ्या रुमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दी-पडसे होत नाही, असे आयुर्वेद तज्ञ सांगतात त्याचाच आधार घेत कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून लोकांनी कापराचा उपयोग करणे सुरू केलेले दिसत आहे.
सर्वसाधारण धार्मिक विधीसाठी वापरण्यात येणारा कापूर प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्ट देवताला प्रसन्न करण्यासाठी, सुख-समृद्धीसह श्रद्धेपोटी देवपूजा करून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. याव्यतिरिक्त कापराचे इतर उपयोग आपल्या आरोग्यासाठी कशा प्रकारे किंवा करता येऊ शकतात याबाबत यु ट्यूब फेसबुक व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडियावर बऱ्यापैकी माहिती प्रसारीत होत असते.
कापराच्या सुगंधाने जीवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात, त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात, असे वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे. याशिवाय कापराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते. सर्दी-पडसे व्हायची लक्षणे असतांंना रुमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दी-पडसे होत नाही, असे आयुर्वेद तज्ञ सांगतात त्याचाच आधार घेत कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून लोकांनी कापराचा उपयोग करणे सुरू केलेले दिसत आहे.
कापराच्या मागणीमध्येेेेे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आणि लोकांकडून खरेदी वाढल्याने कापराच्या घाऊक दरात देशी (दगड्या) कापराचे भाव प्रति किलो ७५० रुपये भाव असलेला किरकोळमध्ये १४०० रुपये किलोवर पोहोचले आहे. दुकानदारही मागणीनुसार भाव वाढवून नफा कमवीत आहेत. तसेच निरमीत कापराच्या वापरामुळे घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते. खोकल्याकरिता आयुर्वेदिक कंपन्या कापराचा उपयोग करतात. त्यामुळे कापूर संरक्षणकर्ता असल्याचा समज लोकांमध्ये आहे. त्यामुळे लोकांची कापराची खरेदी वाढली आहे, अनेकजण कापूर रुमालात ठेवून प्रतिबंधक उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी सुगंध घेत आहेत. याच कारणामुळे विक्री वाढली आहे. सरासरी कापरचा सीझन जून-जुलैपासून दिवाळीपर्यंत असतो, तेव्हा भाव कमी-जास्त होत असतात. पण आता कोरोना व्हायरसमुळे बाजारपेठेत मागणी असल्याने आणि भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे. ठोकमध्ये खुला देशी (दगड्या) कापराचे भाव ७५० रुपये किलो तर डबीत पॅकिंग छोट्या वड्याचा (टॅबलेट) कापूर ६९० रुपये किलो आहे. किरकोळमध्ये दीडपट भावात नेहमीच विक्री होते. कदाचित मागणीमुळे दुकानदार डबीवरील प्रिंटिंगच्या भावात अथवा जास्त भावात विक्री करीत असेल, पण त्याची अधिकृत माहिती नाही. पूर्वी चिकुनगुनिया या आजाराची साथ आली होती त्यावेळी डासांचा प्रार्दुभाव थांबविण्यासाठी लोकांनी कापराचा उपयोग जास्त प्रमाणात केला होता.