कोरोना व्हायरसची साथ पसरू नये याकरिता श्री नाथ षष्ठी महोत्सव पैठण येथील यात्रा स्थगित करण्याचे-जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

0
B. N. N
औरंगाबाद

 जिल्ह्यात कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच जीवित हानी होऊ नये, या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 43 अन्वये पैठण,  तालुका पैठण , जिल्हा औरंगाबाद येथील एकनाथ षष्ठी निमित्त आयोजित यात्रेस विशेष उपाययोजना करण्याच्या दृष्टीने स्थगिती आदेश जारी केले आहे .   

 केंद्र शासनाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना व्हायरस प्रतिबंध आराखडा दि. ३ मार्च २०२०नुसार जिल्हाधिकारी हे प्रतिबंधक मोहिमेचे नोडल अधिकारी आहे. आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर राहावे म्हणून गर्दी यात्रा, मेळावे यावर प्रतिबंध उपाययोजना करण्याचे सदर आराखड्यामध्ये निर्देश दिलेले आहेत .

पैठण जिल्हा औरंगाबाद येथे श्री नाथषष्टी महोत्सवानिमित्त आयोजित यात्रेमध्ये राज्यातील अनेक भागातून  दि.14 ते 16 मार्च दरम्यान अंदाजे तीन ते पाच लाख भाविक  येतात आणि कोरोना व्हायरसचा रुग्ण जर यात्रेमध्ये आला तर यामुळे कोरोना व्हायरस आजारग्रस्तांच्या संख्येत भर पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही

.तसेच या आजारावर अद्याप पर्यंत कुठलाही प्रतिबंधित उपचार किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे या यात्रेत जमणाऱ्या जन समुदयामध्ये कोरोना व्हायरसचा   संसर्ग होऊन या साथ रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जात असलेल्या व्यक्तींना , भाविकांना उपरोक्त कालावधीत प्रतिबंध करणे प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे .


त्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी  औरंगाबाद यांनी   मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 43 अन्वये यात्रा स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top