कवठेमंकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील चाळीस वर्षे व्यक्ती कोरोणा बाधित

0

Bindass News network 
Abhijit shinde
Sangli
01 may 2020

कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथे एक व्यक्ती(पुरुष,वय४०) दि.27 एप्रिल रोजी मुंबई येथून आली होती. 

सदर व्यक्ती काल फिवर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आली असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. या तपासणी मध्ये सदर व्यक्तीची लक्षणे संशयास्पद वाटल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर . पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याशी संपर्क साधला . 

यानंतर सदर व्यक्तीला कालच मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले व कोरोना तपासणीसाठी स्वाब पाठविण्यात आला. 

याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. 

या व्यक्तीच्या  निकटवर्तीय धोकादायक संपर्क बाधितांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येत आहे तर दुय्यम संपर्क बाधितांना कवठेमहांकाळ येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे. 


 या व्यक्तीचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी असून ही व्यक्ती दुधेबावी येथे आपल्या मामाकडे आली होती . 

त्यामुळे दुधेभावी व येडेनिपाणी या दोन्ही ठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ व्यक्ती कोरोना बाधित असून त्यांच्यावर मिरज येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top