धार्मिक कार्यक्रमासह सुरू होणारा पिणाकेश्वराचा वार्षीक याञात्सोव रद्द

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नाशिक

मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र आणि खांदेशातील भाविकांचे आराध्यदैवत व नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दि १२ एप्रिल पासून दंडवत या धार्मिक कार्यक्रमासह सुरुवात होणारा आणि चैत्र नवमी दि.१६ एप्रिल गुरुवारी असलेला वार्षिक यात्रोत्सव कोरोणा या महामारीच्या आजाराचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला असल्याची माहिती येथील देवस्थान ट्रष्टच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण कळविले आहे. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, हा उत्सव रद्द केला असल्याबाबत गावात तसेच पंचक्रोशीत भाविकांना डीजीटल बॅनर लावून माहिती कळविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त असे की, सुमारे तीनशेहूण अधिक वर्षांपासूनची परंपरा असलेला येथील पिनाकेश्वर महादेवाचा वार्षिक यात्रोत्सव पहिल्यांदाच कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठशासनाने दिलेल्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने येथील आणी पंचक्रोशीतील नागरिक दंडवत हे व्रत करतात जी व्यक्ती हे व्रत करते ती व्यक्ती पाच दिवस शर्ट, बनियन हे परिधान करत नाही, शिशिरभूत होऊन गावातील महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करुन बिल्वपत्र व चाफ्याच्या फुलांची माळ अर्पण करून आणि आपल्या गळ्यात एक चाफ्याच्या फुलांची माळ परिधान करून दंडवतीस सुरुवात करतात. गावापासून सात किलोमीटर अंतरावर सैह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर असलेल्या देवाच्या मंदिराच्या दिशेने अनवाणी पायाने चार दिवस दररोज दररोज पहाटे उठून थोडेथोडे अंतर पूढे जाऊन पाचव्या म्हणजे चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी मंदिरात जाऊन देवाची पूजा करून आपल्या गळ्यातील फुलांच्या माळा देवाला अर्पण करून या व्रताची सांगता करतात.


त्यादिवशी दिवसभर डोंगरावरील मंदिराजवळ यात्रा भरते त्यानंतर देवाचा पितळी मुखवटा पालखीत विराजमान करुन रात्रभर गावातील प्रमुख मार्गावरून धिम्या गतीने भजनाच्या दुमदुमत्या स्वरात आणि वाध्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.

 या कार्यक्रमासाठी मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र, खांदेशातील हजारो भाविक देवाच्या नयनरम्य पालखी सोहळा दर्शनासाठी पहावयास येत असतात.
त्यानंतर दोन दिवस गावातील यात्रा भरते व कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात येते यात महाराष्ट्रातील नामांकित मल्ल भाग घेतात.शाप्रकारे आठ दिवस चालनारा हा उत्सव पहिल्यांदाच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला असल्याने देवस्थानचे ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी येथे येउन शासनाच्या अध्यादेशाचे उल्लंघन होणार नाही या बाबत दक्षता घेऊन सहकार्य करावे असे देवस्थान ट्रष्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण आणि विश्वस्त कैलास तुपे यांनी सांगितले आहे यावेळी उपाध्यक्ष अंकुश वर्पे, नानासाहेब पवार, पंढरीनाथ भगत, जगदीश गर्जे, भरत पाटील हे उपस्थित होते. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top