आम्ही पोलिस बोलतोय

0


 लेखक- अनिल शांताराम गांगुर्डे
पोलीस नाईक, नांदगाव पोलीस ठाणे 
 

कोरोना विषाणूची पैदास जन्म चीन येथून आज जगभर पसरला! चीन कोरोनाने हादरला तेंव्हा अनेक देश निवांत बसले होते ते देश आज अमेरिका सारख्या बलाढ्य महासत्ता आसणारा देश पार कोलमडलाय !!इटालिने तर हजारो नागरिकांना गमावलय! स्पेन, जर्मनी, ब्रिटन या देशात कोरोनाच्या विषाणूने परिस्थिती गंभीर केली आहे. आज हे देश उद्धवस्त चेहर्याने हातबल झालेले दिसताहेत .

या महामारीने अवघ्या जगात धुमाकुळ घातला आहे, आपल्या देशातही कोरोनाने ३०जानेवारी२०२०रोजी, चंचू प्रवेश केला होता...आपणही तसे निवांतच राहिलो होतो आपले सरकार गंभीर होते .

जनता माञ निवांत होती. आपल्या देशात ऊंन्हाळा आहे तापमान खुप आहे जास्त ऊष्णतेत, कोरोनाचा विषाणू टिकत नाही.या समजुती खोट्या ठरल्या!! कोरोना आता देशात धुमाकुळ घालणार हे देशातील यंञणांनी ओळखले आणि आपला भारत देश दि.२५मार्चपासून २१दिवसासाठी... लाॅकडाऊन झाला!कोरोनाची संक्रमण साखळी तोडायची असेल.


 ..तर हाच पर्याय होता.
देशात संचारबंदी लागु झाली कोरोनाचा पादुर्भाव टाळण्यासाठी व कडेकोट बंदोबस्तासाठी शहरात व तेथील झोपडपट्टीत,खेडेगाव व तेथील वाड्या ,वस्तीत भर ऊंन्हात आम्ही पोलिस उभे राहिलो आणि आपली सुरक्षितता राखण्यासाठी आम्ही पोलिस आपणास घरात बसावे म्हणून आवाहन करत राहिलो.


लाॅकडाऊनच्या दुसर्या दिवशीच म्हणजे...दि.२६मार्च रोजी भारत देशात .कोरोनाचे रूग्ण कोठे कोठे आहेत .त्या बातम्या व कोरोनाबाधिताचे आकडे पाहून आमच्यावर फार मोठी जबाबदारी पडली आणि आम्ही तहान, भूक, कुटुंब विसरून आपण म्हणजे...जनता कोरोनापासून दूर राहावी म्हणून आमचे कर्तव्य बजावत राहिलो.


आमचे कामच आहे जनतेचे रक्षण करणे!संचारबंदी असुनही लोक गांर्भीयाने घेत नाहित म्हणल्यावर सुरवातीच्या तीन,चार दिवसात पोलिसांनी मोकार फिरणा—या ,मास्क न लावलेल्या ,शहरातल्या उडाणटप्पू तरूणांना व विनाकारण फिरणार्या कांही नागरिकांना व खेड्यातल्या ग्रामस्थांना काट्या  मारल्या !हो, हे खरे आहे.त्याचे व्हिडीवो समाजात व्हायरल झाले!आमच्यावर टिका झाली! पण आंम्ही ही माणसेच आहोत.


आम्ही जनतेचे रक्षक असल्याने व तुमच्या काळजीपोटीच केले, आम्ही कोरोनाचा पादुर्भाव टाळण्याठीच रस्त्यावरती ऊभे आहोत.कांहीना काट्या मारतानांचे व्हिडीवो,पोष्ट व्हायरल झाल्या पण काट्या मारणार्या पोलिसांच्या तोंडावर साधे मास्क सुध्दा नव्हते! हे अनेकांना दिसत नव्हते.आमच्याकडे आमच्या सूरक्षिततेसाठी मास्क ही नव्हते.


तोंडाला हातरूमाल बांधून हे कर्तव्य निभावत होतो.आमच्यावर टिका झाली, आमची बदनामी केली. भूतकाळ आठवला जेंव्हा मुंबईवर २६/११चा, अतिरेक्यांचा हल्ला झाला...तेंव्हा छञपती शिवाजी टर्मिनस मुंबई येथे अतिरेक्यांच्या ए.के.छप्पन पुढे लढण्यासाठी आमच्याकडे फक्त  बंदुका होत्या.अतिरेकी कसाब गोळ्यांचा पाऊस पाडून थकला होता .


त्याला पकडणारे आमचे तुकाराम ओंबळे साहेब याच्या हातात फक्त काटीच होती ... त्यावेळी एका काटीतच... कसाबला ओंबळेंनी जमिनीवर आडवे पाडले होते.आणि त्याच्या छाताडावर बसले होते! त्यावेळी आमचे मोठे अधिकारीही त्या क्षणाला शहिद झाले. आणि ओंबळे ही शहिद झाले!


आज आंम्ही कोरोना विरूध्द लढत आहोत,शासकीय यंञणा कार्यालयात बसून नियोजन करत आहेत.शासन ही व त्यांचे अधिकारी चेंबरमधून, घरातून काम करत आहेत. डाॅक्टर्स,नर्स,त्यांचा स्टाफ त्या त्या व्हाॅस्पिटलमध्ये...आपला जीव धोक्यात घालून...कोरोनाबाधित रूग्णांना वाचवण्यासाठी काम करत आहेत.त्या त्या भागातील सफाई कामगार, कर्मचारी आपले शहरातील वाॅर्ड...व खेडेगाव सुध्दा जंतुनाशक तेची फवारणी करत आहेत.


आम्ही पोलिस तर संक्रमण साखळी तोडण्यासाठी २४तास रस्त्यावर ऊभे आहोत.आज लाॅकडाऊनचा पहिला टप्पा संपून दुसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली आहे.भारत देशात आज कोरोनाबाधितांची संख्या ५१९४इतकी झाली आहे, कोरोनाचा विषाणू आज मुंबईतल्या झोपडपट्टीतही घुसला आहे.याची पोलिस म्हणून आम्हाला चिंता वाटती आहे.



कोरोनाचा विळखा वाढलाय! याचा भयानक ताण आमच्यावर आहे. जेंव्हा कोरोनाबाधिथांचे आकडे वाढत चालले तेंव्हा कांहीना याचे गांर्भीर्य आले. आम्हाला चार.पाच दिवसानंतर राञी घरी जेवायला जायला मिळतय...*घराच्या दारावर थाप मारताच ...कोणाची तरी आई,पत्नी,मुलगा,मुलगी बाबा आले म्हणून दार उघडतात...तेंव्हा घरात जायचं आमचं धाडसच होत नाही .कारण दिवसभर कोणत्याही गल्ली,बोळात,सार्वजनिक ठिकाणी अनेका बरोबर संपर्क आलेला आसतो."हातात काटी आसली ...आणि बोलण्यात दम आसला तरी मनात कोरोनाची अदृश्य  भीती दाटलेली आसते!"


हा कोरोनाचा विषाणू घरात तर घेऊन जात नाही ना !याची मनात धुडकी भरलेली असते.पत्नी पाणी भरलेला तांब्या, हातात घेऊन येते...पण,नाही धाडस होत. तो, पाण्याचा तांब्या घ्यायचा आणि तिच्या हाताला स्पर्श करायला.


कारण  आपल्या सोबत तर ही माहामारी आली  नाही ना?पत्नी ही ओळखते ...चेहरा निराश करते.तेंव्हा आंम्ही अपराध्यासारखं घरात जातो.तेंव्हा घरातील कोणत्याच वस्तूला स्पर्श करायचे धाडस होत नाही.आंघोळ केली की,जेवन करण्याअगोदर लहान मुलांना, झोपलेल्या नजरेखालून घालतो.


त्यांना कुरवाळत ही नाही.मग जेवण  झाल्यावर घरात आराम करावा, खुपच मनात येतं.पण कर्तव्य पार पाडण्यासाठी ...मुलं झोपेतच आसतांना ..त्यांना पुंन्हा एकदा डोळे भरून पाहातो आणि घराबाहेर पडतो*.


*जे ग्रामीण भागातील पोलिस मुंबई, पुणे व इतर शहरात आहेत ते आज तीन महिने झाले आपल्या गावाकडे जाऊ शकले नाहित...तिकडे कोणाचे तरी माय, बाप, पत्नी, मुले आठवण काढतात...हा पोलिस माञ रस्त्यावरती ऊभा असतो. आज देशाने कोरोना विरूध्द युध्दच पुकारले आहे!


संचारबंदीचे पालन करण्यासाठी आंम्ही एखाद्याला मारले की लगेच आपण आमच्या नावावरून,आडनावावरून जात काढता?आणि आमच्या प्रामाणिक पोलिसाविरूध्द राळ ऊठवता! आमचे नामोहरण करता.आमचे खच्चिकरण करता.आम्ही जेंव्हा रस्त्यावरती ड्युटीसाठी ऊभे असतो तेंव्हा कर्तव्य बजावत आसतांना आमची जात फक्त भारत देश असते !आणि धर्म आमचा एकात्मता असतो!


कायद्याचे कडेकोट पालण करणे येवढेच असते. कोरोनाला रोखण्यासाठी आंम्ही पोलिस चांद्यापासून बांद्यापर्यंत...रांञदिवस २४ तास रस्त्यावरती आपल्या पासून कोरोना दूर राहावा म्हणून ऊभे आहोत. कोकणचा १६०० किमीचा सागरी किनारी ही सांभाळत आहोत.


आज आम्हा अनेक पोलिसांना निट राहाण्यासाठी घरे नाहित.मुंबईतल्या चाळीत, झोपडपट्टीत आमचे अनेक पोलिस भाड्याने राहातात.कांहीना शासकीय घरे आहेत .त्या घरांची आवस्था काय आहे .

ते सध्या उस्मानाबाद शहरात पोलिसांच्या क्वार्टर कशा आहेत त्या बघा!त्या पडक्या कलर नसलेल्या भिंती...गळकी, कधिच्या काळातली कौलारं!


पावसळ्यात जेंव्हा पाणी घरात टिपकतं ...तेंव्हा राञं राञं कुटुंबांना जागावं लागतं ! आता नविन घरं होणार आहेत म्हणं. होतील तेंव्हा होतील!


*आम्ही डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करतो. आमच्या अनेक समस्या आहेत परंतु आम्हाला इतर कर्मचारी यांच्या सारख्या संघटना नाहित. आम्हाला आमच्या समस्या सोडवण्यासाठी मोर्चेही काढता येत नाहित.


आज कोरोनाला रोखण्यासाठी शासकीय यंञणा कामाला लागलेल्या आहेत ...संचारबंदीचे कडेकोट पालन करण्यासाठी रस्त्यावर उभा असलेला पोलीस... किंवा घरोघरी जाऊन आपला जीव मुठीत घेऊन  सर्वे करणारा आरोग्य कर्मचारी किंवा दवाखान्यात इलाज करणारा डाॅक्टर ,नर्स हे आपली काळजी घेणारे कर्मचारी या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये ते हिंदू ही नसतात आणि मुसलमान ही नसतात.ते फक्त आणि फक्त  भारतीयच आसतात.


आम्ही संबंध पोलिस आज कोरोनाला हरवण्यासाठी जनतेला आवाहन करत आहोत .आपण ही सगळेच आज एकात्मतेने राहा आणि भारतीयच राहा! सोशेल मीडियाचा वापर करतांना जपून करा! समाजात तेढ वाढेल असे मेसेज पाठवू नका.त्यामुळे आमच्यावरील ताण आणखीनच वाढेल...आणि कोरोना विरूध्द लढायचे सोडून एकमेकातच लढत बसू !आपण भारतातील सजग नागरिक म्हणून आजच्या घडीला वर्तन केले तर आज देश आपला सुसाह्य होईल...! 



आपल्या उस्मानाबादमधील एका खेडेगावातील आमचा एक मिञ पोलिस अधिकारी मुंबईला आहे.तो मिञ फोनवर म्हणत होता .,,"सर!घरी जायला नकोच वाटते आहे कारण लहान तिसरीत शिकणारी गोंडस, छान सुंदर मुलगी आहे. मी घरी गेलं की...डॅडी म्हणत..,बोबडे बोलत गळ्यातच पडते!आणि कांही मिनिटे ती गळ्यालाच चिकटते!!कपडेसुध्दा अंगावरचे काढू देत नाही.आज माझ्या मनात एक अदृश्य भिती  वाटते आहे... आपल्यामुळे ही माहामारी घरात आली तर...ड्युटी कडक आहे वरिष्ठ रागावतील असे सांगतो आणि घरी जायचे टाळतो!"हे सांगतांना त्या पोलिस मिञाचा गळा दाटलेला ...! मी पहिल्यांदा अनुभवला.अनेक मिञ पोलिस आहेत .त्यांची आवस्था आज तशिच झाली आहे.तरीही हे बहाद्दर कर्तव्यात कसूर करत नाहित हे या पोलिस मिञांचे वैशिष्ट्ये आहे.
आज कित्येक पोलीस कर्मचारी घरी जायला भीत आहेत.. कित्येक पोलिसांनी... मागच्या काही दिवसात... आपल्या लेकरांना समोर असून पण जवळ घेतलं नाही!आजचे कोरोनाबाधितांचे वाढते आकडे पाहून ही भीती  सगळ्यांच्या मनात भरली आहे. तरीही हे पोलिस मिञ कोणत्याही अत्याधुनिक सामुग्रीशिवाय रस्त्यावरती जागोजागी कोरोनाचा पादुर्भाव टाळण्यासाठी लढताहेत.
आम्ही पोलिस म्हणून जनतेला वारंवार "घरीच राहा !सुरक्षित राहा!"असे
आवाहन करत आहोत.परंतु कांही महाभाग अनेक शक्कल लढवत आहेत. कोणी पायाला बँडेज चिटकऊन बाहेर रस्त्यावर येतय! कोणी तंबाखुचं कारण देतय! कोणी तरी जिवंत स्ञीला पांढर्या कपड्यात गुंडाळून मोटरसायकलवर दोघाच्या मधात बसवून...काकी मेली आहे. हे प्रेत घेऊन गावाकडे चाललोय, म्हणतो!कोणी डोके दुखीची गोळी आणाय चाललो म्हणतोय! कोण भाजी आणाय चाललो म्हणतो .दिवसातून दोनदा भाजी असते का?  तर कोठेतरी कोरोनाबाधित रूग्णाच्या घरी सगळे दवाखान्यात गेले म्हणून चोर चोरी करतायेत .मग आशा गांभीर्य नसणार्या  महाभागांना कुंकू लाऊन आरती ओवाळून दंडुका तर दिलाच पिहिजे ना? म्हणून सुरवातीला आम्ही कांहीना दंडुके मारले आहेत. एखाद्या चांगल्या इसमालाही मारले असेल! पण हे जाणीवपूर्वक नाही.
कांही ठिकाणी आम्ही जरूर काटी उगारली! परंतु आपण घरात बसावे म्हणुनच आणि त्यातच आपले भले आहे म्हणून!! आमच्यावर नाराज नका होऊ ...! देश कोरोनाने घाबरलेला आसतांनाही कांही गाववाले याञा भरवत होते.


तेथे आमच्या पोलिसांनी हस्तक्षेप केला तर आमच्यावर दगडांचा वर्षाव! आता गावातील पोलिसपाटलांनाही गावगुंडा कडेन टार्गेट केलं जातय...कारण ते पोलिसांना गावातील माहिती देताहेत म्हणून. आशा घटनातून समाज आमच्याशी आसा वागला तर आमचे मनोबल कसे वाढेल!


आज आमच्या पोलिस विभागात महिला पोलिसही आहेत..,त्यांना लहान तान्हुली मुले आहेत...ती मुले ...सांज होतांना, दिवेलागण होतांना..जस गायीसाठी वासरू...हंबरते! तशिच आपल्या आईची वाट बघतात! पण ती, कर्तव्य बजावतांना कोठेही कमी पडत नाही..,जेंव्हा ती ऊंन्हात ऊभारून थकते! 



तिला भोवळ येते. तेंव्हा तिचे ममत्व जागे होते... तांन्हुल्याची आठवण आली की क्षणभर अश्रू ढाळते! आणि कांही क्षणातच काटी घेऊन रस्त्यावरती ऊभे राहाते. संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये म्हणून !नाही तर आपल्या घरात कोरोनाचा विषाणू पोहचु नये म्हणून!!


 आम्ही रस्त्यावरती ऊभे आहोत.आज आंम्ही ञासलोत.पण कर्तव्य टाळता येत नाही .आपण कुटुंबात घरी निवात बसा!आमची कुटुंबे उध्दवस्त चेह—यांनी एक—एक दिवस ढकलत आहेत .आपण तरी घरात आनंदाने राहावे!हेच आमचं जनतेकडे मागणं आहे,



आज कोरोनाशी सामना करतांना आमच्यापुढे अनेक संकटे आहेत.कांही जण कोरोनावर इलाज करणा—या डाॅक्टरांना मारतोय म्हणून तिकडे पळावे लागते आहे.भाजीमार्केट,विविध दुकानापुढे गर्दी झाली म्हणून पळावे लागते.कोठे मजूर उपाशी आहेत म्हणून तिकडे पळावे लागते ,कोणी जादा दराने वस्तू विकत आहेत तिकडे पळावे लागते.


तर स्वस्त धान्य दुकानापुढे व बँकेच्या पुढे सोशल डिस्टिंग पाळा सांगण्यासाठी पळावे लागते.आणि कांहीजण तर चक्क रानातील शिवारात दारूच्या भट्टी काढायलेत! अरे आपली माणुसकी गेली कोठे? म्हणून तिकडे ही पळावे लागते आहे. या सगळ्या ताणतणावामध्ये आंम्ही ही बेभान झालोत. तरीही संयमानेच ही परिस्थिती हाताळतो आहोत, तरीही आमच्या वेदना ते ही पचवत आम्ही पोलिस .


..राज्यातील सगळ्या जनतेला आवाहन करत आहोत की, आपण घरातच सुरक्षित बसा! तरच कोरोनाचा पादुर्भाव टळेल!आणि आपण कोरोनाविरूध्दची पुकारलेली लढाई जिंकु! हा आत्मविश्वास जागवण्यासाठी! कांही दिवसातच पोलिसांचं काम किती महत्वाचं ठरलं! ते जनतेला कळाले. 


कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी पोलिस दलाचे काम कोणालाही नाकारता येणार नाही.हे कळल्यावर शहरातील कांही भगिनींनी जाग्यावर नाष्टा दिला आम्हाला. तसेच खेड्यातही जारचे पाणी कांहीनी दिले आम्हाला!कांही स्वयंसेवी संस्थांनीही मास्क दिले आम्हाला!परंतु पुढचे कांही दिवस महत्वाचे आहेत.लाॅकडाऊन पुढे सहा दिवसांनी ऊठेल ना ऊठेल आपण आपली व परीवाराची काळजी घ्या!गर्दीत जाणे टाळा.

पुंन्हा एकदा आम्ही पोलिस बोलतोत ...कोरोनाला हरवायचे असल तर जनतेने घरीच सूरक्षित बसावे!
जय हिंद


लेखक पोलिस कर्मचाऱ्याचा संपर्क-७०२०९९८४५८

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top