नस्तनपूर शनि देवस्थान ट्रस्ट कडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपये –

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
नस्तनपुर नांदगाव

नांदगाव तालुक्यातील शनी मंदिर देवस्थान च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार योगेश जमदाडे यांच्याकडे सोपविण्यात आला. सदैव सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वाटचाल करणारी संस्था श्री शनीमहाराज मंदिर संस्थान नस्तनपूर च्या वतीने कोरोना आपदस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला हा धनादेश बहाल केला आहे,

संस्थानचे जन.सेक्रेटरी मा.आमदार अनिल आहेर संस्थानचे अध्यक्ष नारायणभाऊ अग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या विश्वास्थांच्या बैठकीत सामाजिक बांधिलकीतुन संस्थानचे वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार या मदतीचा धनादेश तालुक्याचे तहसीलदार जमदाडे यांचे कडे सुपूर्द करण्यात आला,यावेळी संस्थानचे जन.सेक्रेटरी अँड.अनिलदादा आहेर विश्वस्त खासेराव सुर्वे,विजय चोपडा,उदय पवार आदी उपस्थित होते 

या निर्णया सोबतच समाजातील गोरगरीब अपंग,विधवा,व अन्यघटकातील लोकांसाठी संस्थानने जीवनोपयोगी वस्तूंचे कीट बनविलेले असून याचे वाटपाचे सुयोग्य वाटप होईल असे नियोजन युद्धपातळीवरून सुरु आहे अँड.अनिल आहेर यांनी सांगितले सुमारे ३ लक्ष रुपयांपर्यंतच्या वस्तूंचे वाटप करण्याचा विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला आहे.

तालुक्यातील आपद्ग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन प्रसंगानुरूप श्री क्षेत्र नस्तनपूर संस्थानने संपूर्ण भक्तनिवास इमारतीत ७० खाटांचे आधुनिक कॉरंटाईन वार्डची निर्मितीही केली आहे असे अँड. आहेर यांनी नमूद केले 

परिस्थितीनुरूप गांभीर्य लक्षात घेऊन विविध उपाययोजना करण्यात श्री क्षेत्र नस्तनपूर संस्थान सदैव तत्पर आहे असे विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top