डॉ. कपिल आहेर यांची नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक

डॉ. कपिल प्रकाश आहेर यांची नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून शनिवार दि.१८ एप्रिल रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव व्हि.पी.घोडके यांनी पाठवले आहे, नाशिक जिल्हा वैद्यकीय अधिकारी हे पद मागील सहा महिण्यापासून रिक्त असल्याने उप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला होता. 

डॉ. कपिल आहेर यापूर्वी नाशिक जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांनी क्षयरोग विभागात यशस्वीपणे काम केल्याने जिल्ह्यात कोरोणा आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने त्यांची जिल्हा वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते .
 डॉ.आहेर हे नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील कायमस्वरूपी रहिवासी असून त्यांच्या नियुक्तीने नांदगाव तालुक्याला पहिल्यांदाच बहुमान मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 त्यांच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदी निवडीने जिल्यातील व नांदगाव तालुक्यातील आरोग्य विभागास नवसंजीवनी मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांचे वडील डॉ. प्रकाश हिरामण आहेर हे न्यायडोंगरी परिसरातील पहिले एम.बि.बी.एस डॉक्टर होते. तर त्यांचे वडील हिरामण आहेर हे आदर्श शिक्षक होते. त्यांच्या परिवारातील इतर सदस्य देखील आरोग्य सेवेत कार्यरत असल्याचे सांंगण्यात येत आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top