नांदगाव येथे पोषन शिल्लक तांदूळ वाटप

0
 

B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव

सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात शालेय पोषन आहाराचे शिल्लक तांदूळ आज दिनांक 18 एप्रिल 2020 शनिवार रोजी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शाळेतील शा.पो.आहाराचे शिल्लक तांदूळ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वितरित करण्यात आले.या प्रसंगी एकूण 271 पालकांनी याचा लाभ घेतला. तांदूळ वाटप करतांना सोशल डिस्टनसिंगची  विशेष काळजी घेत प्रत्येक पालकाला 1 मीटर अंतरावर एक गोल आखुन देण्यात आले होते.

 व एका एकाला तांदूळ वाटप करण्यात येत होते. या प्रसंगी तांदूळ वाटप करणारे व घेणाऱ्यांमधे 3 फुटाचे पाईप ठेवण्यात आले व त्या पाईप द्वारे तांदूळ वाटप करण्याचे या शाळेत अतिशय  उत्तम पद्धतीचा वापर करण्यात आला. या सर्व वाटपाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर यांनी योग्य पद्धतिने करून पालकांना एक दिवस अगोदर फोन करून सर्व शिक्षकांनी कल्पना दिली व तोंडाला मास्क/ रुमाल लावून येण्याची सूचनाही केली. तांदूळ वाटप करून सर्वांची नोंद करण्यात आली.या प्रसंगी उपस्थित सर्वांनी तोंडाला मास्क /रुमाल वापरले तसेच सोशल डिस्टनसिंग या नियमांचे पालनही केले. 

या सर्वांचे संस्थेचे चेअरमन.सुनिलकुमारजी कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, प्रशासन अधिकारी श्री.गुप्ता पी. पी.  पदाधिकारी महेंद्र चांदिवाल,या सर्वांनी याचे कौतुक केले. सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयाचे  शिक्षक सिद्धार्थ जगताप , अभिजित थोरात , ईश्वर फणसे ,विजय जाधव ,धन्वंतरी देवरे , निलोफर पठाण ,जयश्री चोळके ,अनिता पवार , वैशाली शिंदे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top