कोरोणाशी दोन हात करुन पोलीस निरीक्षक कड यांचे नाशिक रोडला जंगी स्वागत

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
नाशिक

मुंब्रा पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असतांना नाशिक रोड येथील रहिवासी असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या कोरोणाच्या चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

ते नाशिक रोड येथे काही दिवस विश्रांती आले असता त्यांच्या नाशिक रोड येथील निवासस्थानाबाहेर नागरिकांनी पुष्पवृष्टी करुन जंगी स्वागत केले. 


  कड यांचे महिलांनी देखील औक्षण करुण ठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत केले, तसेच टाळ्या वाजून स्वागत करण्यात आले यावेळी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. यावेळी कड यांना अश्रू अनावर झाले होते.

 याप्रसंगी नगरसेवक रमेश धोंडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, सहाय्यक निरीक्षक परदेशी, व्यापारी बँकेचे संचालक प्रकाश घुगे, डॉक्टर पापडीकर, शरद जगताप, पवन रावत, दिनेश पटेल, अतुल धोंडगे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि नागरिक व महिला मोठ्या होत्या, यावेळी संख्येने सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले होते. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top