B.N.N
अरुण हिंगमीरे
बिंदास मिडीया
नांदगाव
कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी देखील अत्यावश्यक सेवा बजावत असून, ठिकठिकाणच्या अनेक शेतकरी बांधवांसोबत दररोज काम करत असतांना कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त संपर्क येत असल्याने आम्हाला सुद्धा विमा संरक्षण शासनाकडून मिळावे असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने निवेदन नांदगावचे आ.सुहास कांदे यांना बुधवार दि. १५ रोजी येथील कर्मचारी बांधवांनी दिले.
सविस्तर वृत्त असे की, शासनाने अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचारी वर्गास जिवन विमा लागू केला आहे , त्याच धर्तीवर बाजार समितीचे कर्मचारी देखील अत्यावश्यक सेवा बजावत असून, बाजारात समितीमध्ये अनेक ठिकाणहुन शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला मका आणि भाजीपाला आणत आहे.
त्यामुळे बाजार समितीच्या कर्मचारी वर्गाचा दररोज मोठ्या प्रमाणात नवनवीन व्यक्तिंशी संपर्क येत असून, अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या इतर जे शासकीय कर्मचारी बांधवांना दिलेल्या विमा संरक्षण आहे त्या धरतीवर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी बाजार समितीचे सभापती तेज कवडे , सचिव अमोल खैरनार , माथाडी संचालक भास्कर कासार , बाबासाहेब साठे यांनी नांदगाव बाजार समिती कर्मचारी वर्गामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना नांदगावचे आ. सुहास कांदे यांचे मार्फत दिले.
यावेळी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून सदर विमा योजना लागू करणे संदर्भात प्रयत्न केले जातील असे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी यावेळी दिले.
या निवेदनाच्या प्रतीपणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, पणन संचालक महाराष्ट्र राज्य, जिल्हा उपनिबंधक नाशिक, उप सरव्यवस्थापक कृषी पणन मंडळ, आणि तहसीलदार नांदगाव यांना देण्यात आल्या आहेत.