.
B.N.N
अरुण हिंगमीरे
नाशिक
नाशिकचे जिल्हा अधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्ह्यातील, नाशिक, इगतपुरी, चांदवड, मालेगाव, सिन्नर, निफाड, सुरगाणा, कळवन,त्रंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, नांदगाव, येवला, सटाणा, देवळा पंधरा तालुक्यांंपैकी
मालेगाव नाशिक आणि इतर दोन तालुके वगळता इतर आकरा तालुक्यात उद्योग व्यवसाय सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.
तसे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले जिल्ह्यातील ८० ते ९०% भुभाग कोरोणा मुक्त असल्याने तेथे उद्योग व्यवसाय सुरु केले जाउ शकतात परंतु लॉकडाउनचे बंधने पाळावी लागणार आहे. ज्या ठिकाणी शासनाचे निर्देश पाळले जानार नाही तेथील उद्योग व्यवसाय बंद करण्यात येईल असे तरी नागरिकांनी ठरवा आपण शासनाच्या निर्देशाचे पालन करुन खुल्या झोनमधील राहायचे आहे की लॉक डाऊन मध्ये राहायचे आहे. असे त्यांनी सांगितले.
तसेच अत्यावश्यक सेवेची आणि मजुरांची वाहतूक करनारे वाहतूक सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी आर.टी. ओ विभागाकडून कार्यवाही केली जात आहे. त्यासाठी कृषी विभाग व महसूल विभाग आणि पोलीस विभागाकडून हेल्पलाईन सुरु करण्याची प्रक्रिया चालू आहे.
कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्याची आता पर्यंत परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी सुचनांचे पालन केल्यास आपण लवकरच यातुन सुखरूप बाहेर पडू अशी आशा त्यांनी व्यक्त केली, व आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वांनी चांगली सात दिली असून यापुढेही सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो असे म्हणाले.