B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असतांना संगमनेर येथून नांदगाव मार्गे बेकायदेशीर २७ प्रवाशांची कंटेनर मध्ये वाहतूक करत असतांना पोलीसांच्या जाळ्यात
सविस्तर वृत्त असे की , शासनाचे कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनचे आणि जिल्हाबंदीचे आदेश धुडकावून संगमनेर येथून नांदगाव मार्गे २७ मजुरांना घेऊन जानारा कंटेनर ट्रक क्रमांक आर. जे. ०९ जी. बी. ३३७५ घेऊन जात असतांना नांदगाव येथील येवला रस्त्यावरील रेल्वे फाटका जवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर आणि पोलीस काँन्सटेबल एस.जे. सावकारे गस्त घालत असतांना औरंगाबाद रोडवरील बैध्दविहार जवळुन दि.१ एप्रिल रोजी ४.३० वाजता संशयास्पदरितीने जात असतांना दिसून आल्याने यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर आणि पथकाने वरील कंटेनर ट्रक अडवून चालकास त्याचे नाव गाव पत्ता इतर माहितीची चौकशी केली असता. त्याने त्याचे नाव गुरुनामसिंग प्रितमसिंग (वय ४७) असे सांगितले असून पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेराबाबा नगर, धारोवाली येथील असल्याचे सांगितले.
पोलीस पथकाने सदर ट्रकच्या कंटेनर उघडून झडती घेतली असता त्यात २७ पुरुष मिळून आले त्यांंची येथील औरंगाबाद रोडवरील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून सर्वांना शासकीय निवारा केंद्रात पाठवण्यात आले असून वरील गाडीचा चालक गुरुनामसिंग याच्याविरुद्ध जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करुन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केल्याने पोलीस काँन्सटेबल एस जे सावकारे यांनी सरकार पक्षाच्या वतीने कलम १८८ भा.द.वी. ६६(१) १९२ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १४४ /२०२० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर हे करत आहेत.