धनंजय माने
बिंदास न्यूज नेटवर्क
बीड
जिल्ह्यात कोरोना बाधिताचा आकडा वाढतच आहे कोरोना बाधितांची संख्या 11 वर पोहचली असताना काल कोरोना पोझीटीव्ह असलेल्या महिलेचा मृत्यू झाला आज पुन्हा नव्याने 67 स्वॅब पाटवण्यात आले होते या पुर्वीचे दोन स्वॅब रिपोर्ट प्रलंबित आहेत.
आज नव्याने पाठवलेले 67 अहवाला पैकी आठ अहवाल पोझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधिताची संख्या 19 वर 3 प्रलंबित.
जिल्हा प्रशासनाने अतापर्यंत 577 स्वॅब पाठवले होते .
यातील 497 अहवाल निगेटीव्ह आले असुन 11 आवाहन पोझिटीव्ह आले होते काल पाठवलेल्या 76 स्वॅब पैकी दोन अहवाल प्रलंबित आहेत. 48 तासानंतर पुन्हा पाठवले जाणार होते.
जिल्ह्यामध्ये जवळपास 47 हजार 14 ऊसतोड मजुर आले आहेत हे सर्व आपआपल्या परिसरात कोरन्टाईन करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यात आलेले 7 पोझिटीव्ह रूग्णापैकी एक मयत तर सहाजण पुण्याला हलवले आहेत बीड जिल्ह्यातील उर्वती चार पोझिटीव्ह रूग्ण आढळलेल्या ईटकुर, हिवरा, पाटणसांगवी आणि कवडगाव थंडी या गावात व गावचा परिसर प्रतिबंदित करण्यात आला असुन ईटकुर या कॉन्टेनमेट झोन मध्ये 7 गावातील 1275 घरातील 4740 नागरीकांचा सर्वे 14 अरोग्य पथकांने केला आहे.
हिवरा ता.माजलगाव येथी पाच गावातील 818 घरामधील 3397 नागरीकांचा सर्वे सात आरोग्य पथकामार्फत करण्यात आला आहे पाटण सांगवी ता.आष्टी परिसरातील कॉन्टमेट झोन पाच गावातील 1276 घरामधील 6271 नागरीकांचा सर्वे जवळपास 13 आरोग्य पथकांने केला आहे
आणि कवडगाव थडी ता.माजलगाव येथे कॉन्टमेंट झोन मधील 7 गावातील 1076 घरामधील 5096 नागरीकांचा सर्वे सात आरोग्य पथकाने केला आहे. आज सकाळी जिल्हा प्रशासनाने जवळपास 67 जणाचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते रात्री १२;३० वाजता अहवाल आला यात ८ जन पॉजीटीव्ह असल्याने कोरोना बधितांचा आकडा १९ वर गेला आहे.