बिंदास न्यूज नेटवर्क
कोरोना महामारीने च्या काळात रोजगार हिरावला गेल्यामुळे आर्थिकदृष्टय़ा होरपळलेल्या परप्रांतीय नागरिक परिवारांसाठी वैजापुर चे प्रशासकीय अधिकारी , राजकारणी मंडळी व सामाजिक कार्यकर्ते आदर्श निर्माण करीत आहेत...
असेच आदर्श राजकारणी मा.नगराध्यक्ष दिनेश परदेशी , तहसीलदार महेंद्र गिरगे , पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी , सीओ विठ्ठल डाके , आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर , सामाजिक कार्यकर्ते भारतीय जैन संघटनेचे निलेश पारख , राहुल सागर , दिलीप ञिभुवन , वाहन नियंत्रक संदीप बागुल यांच्या उपस्थितीत मध्यप्रदेशातील 23 महीला पुरूषांना आज एस.टी. ने सकाळी 09:30 वाजता नविन बसस्थानक येथुन रवाना करण्यात आले.
अशाच प्रकारच्या सामाजिक सहकार्याच्या भावनेने या परप्रांतीयांच्या जेवण , चहापाणी यांची अतिशय उत्तम व्यवस्था गंगापुर चौफुली येथे करण्यात आली आहे.
यासाठी अमोल सोनवने , दिपक आधुडे , प्रशांत कंगले , वर्धमान ग्रुप चे हेमंत संचेती , राजेश संचेती , प्रकाशचंद बोथरा , राजेंद्र पारख , जितेंद्र संचेती , निलेश पारख , कीरण सारडा , प्रफुल संचेती , संजय मालपाणी , विजय चव्हाण , पंकज कुंदे , गौरव दोडे , गणेश पहाडी , मेहुल पोकर्णे , ग्यानेश्वर शिरसाठ आदी परीश्रम घेत आहेत.