B.N.N
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
स्विप्ट गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदगाव तालुक्यातील जातेगाव जवळ गाडीने तीन पलट्या घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीमध्ये गेल्याने चालकासह गाडीतील चौघे जखमी झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजय फकीरा शिरसाट वय ४८, नंदु गारे वय ३६, मनोहर शेळके वय ३५ हे तीघे राहणार बाहदुर ता. चांदवड आणि भरत जाधव वय ३५ पिंपळगाव बसवंत असे चौघे शनिवार दि. ३० रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारासऔरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे अद्रकचे बियाणे खरेदी करण्यासाठी स्विप्ट कार घेउन भरधाव वेगाने जात असतांना चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने
जातेगाव गावापासून एक किलोमीटर अंतरावर ढेकू रस्त्यावर सोनवणे वस्ती जवळ तीन पलट्या घेउन रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत गेल्याने वरील चौघेही जखमी झाले. त्यांच्यावर जातेगाव येथील खाजगी दवाखान्यात प्रथमोपचार करण्यात आले असून या बाबत स्थानिक पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.