नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी लक्ष्मण कचरु पवार वय ३७ यांचे ढेकू शिवारात शुक्रवार दि.२९ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत पडल्याने अपघाती निधन झाले आहे.
त्यांना परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी तातडीने विहिरीच्या वर काढून उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी पवार यांस मृत घोषित केले.
त्यांचे शव विच्छेदन करूनत्यांच्यावर त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मण पवार हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या अपघाती निधनाची वार्ता गावात समजताच सर्वत्र शोककळा पसरली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, दोन भाऊ, भावजया, तीन बहिनी, भाचे, पुतणे असा परिवार आहे.
वरील घटनेची नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश पवार पोलीस नाईक अनिल गांगुर्डे हे करत आहेत