B.N.N
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील रहिवासी आणि
पुणे येथे १९९८ पासून पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेले एकनाथ हरिभाऊ पेहरकर हे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर नाका-बंदी दरम्यान येरवाडा विभागात कर्तव्यावर असतांनी 21 एप्रिल रोजी त्यांना अचानक ताप आल्याने फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी दोन दिवस ट्रीटमेंट घेतली परंतु ताप न उतरल्याने २३ एप्रिल शुक्रवारी वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी-चिंचवड येथे अधिक उपचार घेण्यासाठी दाखल झाले असता त्याच्या इतर चाचण्यांसोबत कोरोणा आजारा बाबतीत चाचण्या घेण्यात आल्या असता ते कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे निदर्शनात आले.
त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. त्याच्यावर सलग सतरा दिवस उपचार घेतले असता, त्यांच्या पुन्हा घशातील स्त्रवाच्या चाचण्या केल्या असता त्या निगेटिव्ह आल्याने पेहरकर यांना दि ३ मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला.
पोलीस म्हणून नाही तर एक माणूस म्हणून मनमिळाऊ स्वभाव असलेल्या एकनाथ पेहरकर यांचे यावेळी ते रहात असलेल्या परिसरातील नागरिकांनी त्यांचे भारतमाता की जय, वंदे मातरम, कोरोणा योध्याचा विजय असो, अशा घोषणा देत व पुष्पवृष्टी करत स्वागत केले. त्याचप्रमाणे त्यांच्या घरच्या आणि परिसरातील महिलांनी त्यांचे औक्षण देखील केले. त्याचप्रमाणे जातेगाव येथील सरपंच जयश्री लाठे, उपसरपंच नारायण पवार आणि मित्रपरिवारांनी फोनवरून व सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले.
यावेळी भावनिक झालेल्या एकनाथ पेहरकर यांनी माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे, आणि आमचे ग्रामदेवता पिनाकेश्वराच्या कृपेने मी कोरोणाशी दोन हात लढाई जिंकून ठणठणीत बरा झालो आहे. मला कोरोणा आजाराची लागण झाल्याचे समजताच मी सुरुवातीला खचून गेलो होतो, माझे वडील हरिभाऊ पेहरकर वय ८७ आणि आई जनाबाई पेहेरकर वय ८३ हे वयोवृद्ध तसेच
आमच्या सर्व दहा मानसांचा परिवारातील सदस्यांना काँरंटाईन करण्यात आले, त्यांचे व सर्व सोसायटी मधील इतर २२ रहिवाशांचे असे एकुण ३२ रहिवाशांचे व त्यांच्या सोबत काम करणार्या इतर सोळा पोलीस कर्मचाऱ्यांचे घशातील स्त्रवाचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले परंतु सर्वांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर मी माझी मानसिकता बदलून धैर्याने कोरोणाचा मुकाबला केला. आजार कोणताही असो तो चांगला नाहीच, तरी कोरोणा ह्या आजारावर अद्याप कोणत्याही प्रकारचे
औषधोपचार निघालेला नसल्याने सर्वांनी स्वताःच रक्षण करणे स्वताःचे गरजेचे आहे, शासनाचे निर्देश पाळा घरातच रहा स्वस्त रहा असा सल्ला देखील उपस्थितांना त्यांनी दिला, व कोरोणा हा बरा होणारा आजार आहे जर आपल्या परिचयातील कोणास कोरोणा झाला तर त्याची मानसिकता ढासळू देऊ नका त्यांचे मनोबल वाढवा असे म्हणाले, व उपस्थितीतांचे आभार मानले. आणि घरात प्रवेश करताच देवघरातील देवाचे दर्शन घेऊन आई,वडिलांचा आशिर्वाद घेतला.
याप्रसंगी त्यांनी माहिती देतांना सांगितले की, आम्ही दिघी पणे येथील महालक्ष्मी अपार्टमेंट दुसऱ्या आणि लहान भाऊ नारायण पेहरकर चौथ्या मजल्यावर रहातात ते देखील पुणे शहर पोलीस दलात आहेत असे सांगितले, तर याप्रसंगी नारायण पेहरकर यांनी बोलतांना म्हणाले की, आम्ही सहा भावंडे आहोत, आणि एक बहिण आहे, निर्मलाताई गायकवाड त्या पिंप्री चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका आहे. दोघे भाऊ विज वितरण कंपनी मध्ये नोकरी करत होते
, त्यापैकी सर्वात मोठे भाऊ नामदेव हे विजेच्या खांबावर काम करत असतांना अचानक विज पुरवठा सुरु झाल्याने त्यांना शॉक लागल्याने खांबावरून पडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आनखी एक भाऊ सध्या विज वितरण कंपनी मध्ये कार्यरत आहे. तर एक भाऊ रेल्वेत नोकरी करत होते ते सेवा निवृत्त झाले असून ते व आनखी एक भाऊ जातेगाव येथील वडिलोपार्जित असलेली शेती सांभाळत आहे असे सांगितले.