बोलठाण परिसरात वादळी वार्यासह झालेल्या पावसाने अंदाजे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
बोलठाण, नाशिक

नांदगाव तालुक्यातील बोलठाण व जवळकी परिसरात गुरुवार दि.१४ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे
दोन व्यापार्यांसह पाच शेतकर्यांचे सुमारे शेड आणि घरावरील पत्रे उडाल्याने कांद्याचे मकाचे, गहू बाजरी यासह शेतीसाठी साठवून ठेवलेले रासायनिक खते ओले झाल्याने अंदाजे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


सविस्तर माहिती अशी की, बोलठाण व जवळकी गावाच्या शिवारात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे बोलठाण येथील व्यापारी सरीता निलेश चिचानी यांच्या वरद ट्रेनिंग कंपनीचे कांद्यासाठी बनविलेले दोन मोठे  ८० × १००  फुट लांबी रुंदी असलेले शेड जमिनी दोस्त झाले. 

असून पावसाने अंदाजे १४०० क्विंटल कांदा ओला झाल्याने सुमारे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तसेच सुरेष सोनी त्यांच्या शीव ट्रेडिंग कंपनीचे ६० × १०० फूट लांबी रुंदी असलेल्या एका बाजूने झुकले व अंदाजे ४०० क्विंंटल कांंदा ओला झाला असल्याने त्यांचे अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान झाले  असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


तसेच जवळकी येथील शेतकरी कडुबा निकम यांचे घरावरील पत्रे उडालेले अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच अहेमद पटेल यांचे पत्रे उडाल्याने त्यांचे सुद्धा 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच उजेर पटेल यांचा जनावरांसाठी साठवलेला चारा आणि पत्र्याचे शेड उडाले आहे. 

त्यांचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,  व अमिन पटेल यांचे पत्र्याचे शेड उडाले असून विस क्विंटल मका आणि २०० क्विंटल कांदा ओला झाल्याने त्यांचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, 

जाफर पटेल यांचे घराचे पत्रे उडाल्याने शेतीसाठी आणून ठेवलेले रासायनिक खते व गहू आणि बाजरी ओली झाल्याने त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

वरील दोन्ही व्यापारी आणि जवळकी येथिल शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत परिसरातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top