जमिर खलफे
बिंदास न्यूज नेटवर्क
रत्नागिरी, कोकण
मुंबईतून शस्त्रक्रिया होऊन रत्नागिरी दाखल झालेल्या कोरोनाबाधित महिलेचा आज जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दुसरा बळी गेला आहे.
या महिलेची सायन हाॅस्पिटलला शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या 65 वर्षीय मुंबईहून आलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.सतत वाढत चाललेल्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे धास्तावलेल्या रत्नागिरीकरांच्या चिंता या घटनेमुळे वाढली आहे.
खेडच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यू नंतर आता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आता एकूण कोरोनाचे 2 बळी झाले आहेत.