B.N.N
अरुण हिंगमीरे
नाशिक
जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचे प्रमाण (टक्के) मालेगाव ७१.१०, नाशिक शहर ७१.११, नाशिक ग्रामीण ५१.०२, एकुण जिल्हा : ६८.९० आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू : ४.२६ टक्के आहे.
जिल्ह्यातील मालेगाव शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण झपाट्याने वाढल्याने "हॉटस्पॉट' ठरले होते. असे असले तरी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या असाधारण मेहनतीमुळे राज्यातच नव्हे, तर देशभरात सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्णांच्या प्रमाणात नाशिक अव्वल ठरले आहे,आरोग्य यंत्रणेसह पोलीस यंत्रणा व इतर सर्वांनी घेतलेल्या परिश्रमामुळे शक्य झाले असल्याने आरोग्यमंत्र्यांसह विविध वरिष्ठांनी त्यावर समाधान व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील ७७५ कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ५३४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे होणारा मृत्युदर ४.२९ टक्के आहे.
मालेगावात नागरिकांसह पोलिस, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूने विळख्यात घेतल्याने राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष वेधले गेले. अत्यंत झपाट्याने मालेगावात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत गेला.
त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणाही सक्षमतेने रुग्णसेवेसाठी झटली. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांचे ६८.९० टक्के प्रमाण हे राज्यातीलच नव्हे, तर देशात अव्वलस्थानी आहे, ही बाब जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी सुखावणारी आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या गेल्या महिन्याभरात अतिशय वेगाने वाढत होती. त्यामुळे सबंध प्रशासन अलर्ट झाले. जिल्हाधिकारी रोज मालेगावचा दौरा करीत होते. कृषीमंत्री दादा भुसे दिवसभर प्रत्यक्ष ग्राऊंडवर काम करीत होते. महापालिकेचे आयुक्त.
सहाय्यक आयुक्तांसह विविध अधिकारी अगदी रुग्णांशी सुसंवादापासून तर उपाययोजना व अन्य कामकाजावर बारीक व जवळून लक्ष ठेऊन होते.
या सगळ्यांनी एव्हढे लक्ष घातले की अगदी, महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार व त्यांच्या सहकारी सहाय्यक आयुक्तांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले. मात्र ते डगमगले नाहीत. त्या स्थितीतही ते सक्रीय होते.
बंदोबस्तावरील 142 पोलिस व राज्य राखीव दलाच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागन झाली होती. सबंध प्रशासन, आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारीका या सगळ्यांच्या मेहनतीला फळ आले.
आता संसर्ग नियंत्रणात आला आहे. वाढणाऱ्या रुग्णांचा आलेख कमी होऊ लागला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुक्तीचे रुग्णांचे प्रमाण ३३.६४ टक्के आहे. तर दिल्लीत ३५ टक्के, गुजरातराज्यात ३८.४३ टक्के, तमिळनाडूमध्ये २३.५८ टक्के, तेलंगणात ६८.६९ टक्के, केरळराज्यात ९१.७६ टक्के, पंजाबमध्ये १०.३९ टक्के, तर महाराष्ट्रात २२.६३ टक्के आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचे प्रमाण (टक्के) मालेगाव ७१.१०, नाशिक शहर ७१.११, नाशिक ग्रामीण ५१.०२, एकुण जिल्हा : ६८.९० आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू : ४.२६ टक्के आहे.
कर्मचाऱ्यांनी निश्चय केला, व त्यास नागीरकांनी त्यांना प्रतिसाद दिला तर काय होऊ शकते, याचा धडा नाशिककरांनी घालुन दिला आहे. "कोरोना' ससर्गाने अचानक चर्चेत आलेल्या नाशिकने चमत्कार घडवला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र परिश्रमाला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ७७५ कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी शुक्रवारी ५३४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.