संतोष गंगवाल
देवगांव रं
कन्नड,
विनापरवाना गांवात आल्यास दोघांवरही गुन्हा दाखल करण्याचा सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय आहीरे यांचा इशारा
-पर जिल्ह्यातुन आपल्या जिल्ह्यात विना परवाना येणाऱ्या जेहुरतांडा (ता.कन्नड) येथील दोघा जणांविरोधात कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी देवगाव रंगारी पोलीसांनी रविवारी (ता.तीन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परजिल्ह्यातुन विना परवाना प्रवास करणाऱ्या व त्यांना आश्रय देणाऱ्या परिवाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी दिला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, रविवारी (ता.तीन)रोजी औराळा परिसरात पोलीस
लाॅकडाऊन संदर्भात गस्त घालत असतांना जेहुर तांडा गावाचे पोलीस पाटील बाळु सावंत यानी माहीती दिली की,जेहुर तांडा येथील रमेश मंगु राठोड व त्याची पत्नी अलका राठोड हे त्यांच्या तिन मुलांसह मालेगांव जि.नासिक येथुन विनापरवाना आलेले आहे.
मागील चार वर्षापासुन ते मालेगांव येथे रोजगारनिमित्त स्थालातरीत होते.तेथेच राहत होते.
याप्रकरणी बिटजमादार भास्कर खुळे यांच्या फिर्यादीवरुण त्यांच्या विरुध्द भा.द.वि.१८८/२६९ नुसार संचारबंदीचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राठोड कुटुंबातील सदस्यांची औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार भास्कर.खुळे,सुदाम साबळे आधिक तपास करत आहे.
या प्रकारचा ग्रामीण भागात पहिलाच गुन्हा दाखल झाल्याने ग्रामिण भागात विनापरवाना गांंव,वस्ती,तांड्यावर येणाऱ्या लोकांवर वचक बसणार आहे.