लॉकडाऊन मुळे तमिळनाडू मध्ये मनमाड येथील अडकलेले १२ विद्यार्थ्यांची घर वापसी

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
नाशिक

कोरोणामुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे 
मनमाड येथील १२ विद्यार्थी तामिळनाडू राज्यात येरवड येथे रेल्वे विभागात प्रशिक्षण घेत असतांना अडकले होते.


हे विद्यार्थी सेलम, मिरज येथून जळगाव पर्यंत पोहचल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री ना.छगन भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रयत्नातून खाजगी बसच्या माध्यमातून आज मनमाड येथे सुखरूप पोहचले आहे.


याप्रसंगी हर्षल गायकवाड आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, लॉकडाऊन सुरू असल्याने आम्ही तामिळनाडू राज्यात येरवड येथे रेल्वे विभागात प्रशिक्षण घेणारे १२ विद्यार्थी एकाच ठिकाणी अडकलो होतो. 

त्यानंतर आम्ही नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे परतण्यासाठी मदत मागितली. 

त्यांनी तात्काळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड येथे सुखरूप पोहचण्याची व्यवस्था केली. प्रवासात ते सातत्याने आमच्याशी संपर्कात होते. 

ज्या ज्या ठिकाणी आम्हाला अडचणी आल्या त्या त्यांनी तात्काळ सोडविल्या. आम्ही सर्व विद्यार्थी पालकमंत्री ना.छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांचे आभारी आहोत असे म्हणाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top