प्रा. आनंद निकम ,
टूनकी,औरंगाबाद
(संपादकीय)
प्रति,
डॉक्टर्स आणि सर्व आरोग्य विभाग.
वि. वि. पत्रास कारण की,तुम्हाला जास्त बोलायला आवडत नाही हे,आम्हा सामान्य नागरिकांना माहित आहे , पन आम्हाला आमच्या भावना प्रकट करण्यासाठी असा पत्र प्रपंच करावाच लागतो. काल परवा आम्ही पोलिस यंत्रनेशी संवाद साधला आणि त्या यंत्रनेला खुप समाधान वाटले. असो.
खरे म्हणजे कोरोना या शत्रुला हरविन्यासाठी युद्धभूमिवर पराक्रम गाजवणाऱ्या संघर्शाच्या रथाची दोन चक्रे आहेत एक प्रशासन आणि दूसरे आरोग्य सेवा! ही दोन्ही चक्रे सोबत आणि योग्य दिशेने धावली तरच या रणभूमित शत्रुचा पाड़ाव शक्य आहे याची आम्हा जनतेला जाणीव आहे.
या संकटात प्रत्येक जन आपापल्या परिने काम करत आहे मात्र तुमचे काम म्हणजे वाघाच्या जबडयात हात घालने इतके कठिन आहे. संशयास्पद व्यक्तिचा स्वाब घेताना किती काळजी घ्यावी लागते हे आम्ही जाणून आहोत. सुरुवातीला तुम्हाला किट नव्हत्या तरी पन तुम्ही कोणतीही तक्रार न करता मिळेल त्या साधनाचा वापर करत आरोग्य सेवा सुरुच ठेवली.येणारी व्यक्ति कोणत्या धर्माची, जातिची, प्रांताचि आहे याचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालून तुम्ही सर्व सेवा देत रहिलात, या साहसी पनाचे कौतुक करावे तितके कमीच आहे.काळ एकेकाला मृत्युच्या खाईत लोटत असताना तुम्ही प्रत्येकाला पुन्हा वर काढ़त आहात!
तुम्ही प्रत्येक जन घरी बसून सहज दोन - चार वर्ष न कमविता राहु शकतात मात्र केवळ आणि केवळ भारतीय नागरिक यांची ग़ैरसोय होवू नये म्हणून अगदी ग्रामीण भागातील डॉक्टर्स, मेडिकल, आशा,अंगणवाडी कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सँपल टेस्ट लँब मधील सर्व कर्मचारी पासून ते शहरी भागातील सर्व वैद्यकीय यंत्रणा , अधिकारी आपन सर्वांनी या कठिन काळात आम्हाला वाचविले आहे.
सेवा करताना तुमच्यातील सुद्धा काही लोकांना कोरोना चा संसर्ग झाला त्यातील सौ .डॉ स्वाति अंबेकर यांची प्रतिक्रिया आम्ही सर्वांनी वाचली आणि तुम्ही पन किती संकटात आहे याची जाणीव झाली. तुमच्या गाडीवरिल रेड क्रॉस ज्याला आम्ही प्लस म्हणतो , त्या सिंबॉल प्रमाणे तुम्ही आमचे जीवन प्लस करत आहेत.
तुमचा उत्साह वाढविन्यासाठी तुम्हाला आमच्या ह्या कोरडया शुभेच्छाची कदाचित गरज नसेलही पन आम्ही तुमच्या या कार्याने भारावून गेलोय! आम्हाला वाचविनारे तुम्ही दानवीर ,मग तुम्ही तुमची काळजी घ्या असे म्हणायची आम्हाला परवानगी आहे की नाही माहित नाही ,पन तुमची काळजी वाटते म्हणून सांगतो तुम्हाला या देशासाठी खुप मोठे कार्य करायचे आहे, हे युद्ध आपल्याला जिंकायचेच आहे म्हणून स्वत चिहि काळजी घ्या.
खर सांगू? इस्पीतळमधिल तुमच्या 24 तासांच्या जागरुकतेमुळे खोलीच्या कोपरयात लपून बसलेल्या काळालाही समोर येण्याची हिंमत होत नाही हे. ही अतिशयोक्ति वाटत असेल मात्र तरीही वास्तव आहे!
शेवटी तुमच्या सारख्या मानवतेच्या उपासकांना जन्म देणारे तुमचे आई- वडील, तुम्हाला प्रोत्साहन देणारे बहिन भाऊ, पत्नी/पति आणि वयाने लहान मात्र देशभक्ति साठी आपल्या पप्पा आणि मम्मी यांना दररोज दरवाजा किंवा खिड़कितुन आपल्या चिमुकल्या हातांनी बाय बाय करणारे मुले / मूली यांना आम्हा सामान्य नागरिकांचा विनम्र प्रणाम!
कळावे आपले,
भारतिय नागरिक.
ता. क.- काल मुंबई येथील लोकमान्य टिळक इस्पितळात एका चीमुकल्या कोरोना ग्रस्त मुलाचे मेंदूचे ऑपरेशन करून तुम्ही त्याचे प्राण वाचविले याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र आपला ऋणी आहे.