पालघर पाठोपाठ नांदेड हादरलं… मठात घुसून महाराजांसह दोघांची निर्घृण हत्या.. नाशिक जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने निषेध व्यक्त

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
नाशिक.

पालघर येथील दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये एका साधूचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे.
 उमरी ( नागठाण ) नांदेड येथील वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मगुरू श्री 108 रुद्र पशुपती महाराज वय अवघे 29 यांची व त्यांचा शिंदे नामक शिष्य यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे , त्यांच्या हत्येचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रा,ह नाशिक जिल्ह्यात लिंगायत समाजात उमटले असून धर्मप्रसार व प्रचार करणाऱ्या धर्मसंस्था व धर्मगुरू यांनाच लक्ष्य केल्याने धर्मविरोधी शक्ती यापासून धोका निर्माण झाला आहे. असा सुर नाशिक येथील समाजाच्या बैठकीत समोर आला आहे.

उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा आणि भगवान शिंदे रा. चिंचाळा ता. उमरी असे असल्याचे समजते. शिंदे हे मठापतील सेवेकरी होते. यांचीही हत्या रात्री दीड वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. 
या घटनेचा नाशिक जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने वसंतराव नगरकर, बद्रीनाथ (नाना) वाळेकर, संजय फोलाने, वसंत घोडके, सुनील कबाडे , संदेश हिंगमीरे , रवींंद्र गाडे, धोंडू हिंगमीरे, विलाशशेठ गाडे , प्रकाश सांबरे डॉ. शाम झळके , अविनाश भुसारे, जगदीश घोडके, अंबादास आंदळकर, उमाकांत घोगाणे,डॉ.नितीन शाहीर, कुणाल दिवटे, राजेश डबे, चंद्रशेखर दंडने,अरुण लोहारकर , सुनील हिंगमीरे, जयवंत लोहारकर यांनी निषेध करण्यात आला असून साधुमहंताच्या हत्या होण्याची दुसरी घटना असल्याने शासनाने वरील विषय गांभीर्याने घेने जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात घेऊन दोशी असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे बद्रीनाथ वाळेकर यांनी सांगितले. यावेळी संतोष हुकिरे,अनिल गुळवे, भिकन नीलकंठ, भिकन फटत्तरफोडे, दिगम्बर नगरकर, मनिष घोडके, सोमनाथ डबे, परमानंद घोंगाने, योगेंद्र महमाणे ,
अँड.शंकर वाळेकर, रमेश बोबडे , रमाकांत तांबोळी ,  नंदकुमार गोंधळे, प्रदीप चौधरी, राजा भाऊ खडके ,  दत्ता सोनवणे, शेखर भायभंग, रवी लोहारकर, महेश डबे मोहन होणराव, भरत खोडदे, शिवाआप्पा लिंगायत हे उपस्थित होते.या घटनेने भाविकात एकच खळबळ उडाली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर गळा दाबून त्यांची केली.व महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांंना परिसरातील नागरिक जागे झाले म्हणून या आरोपीने तेथून पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे रा. चिंचाळा ता. उमरी असे असल्याचे समजते. शिंदे हे मठापतीचे सेवेकरी होते. सेवेकर्याचीही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. महाराजांची हत्या झाल्याची माहिती भाविकांना समजताच एकच खळबळ माजली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top