कोरोणा रुग्णांची सेवा करतांना बाधित झालेल्या कोरोणा योध्या सीमा पगारे यांंचे पुष्पवृष्टी करून स्वागत

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
नांंदगाव

 नाशिक येथील शासकीय रुग्णालयात परिचारिका असलेल्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मुळच्या रहिवासी असलेल्या सौ.सीमा राहुल पगारे  वय ४१ ह्या महिला कोरोणा योध्याचे नाशिक येथील इंदिरा नगर येथे पुष्पवृष्टी करुन आणि टाळ्या वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. 

त्यांना दि. ३ ते १० मे या कालावधीत कोरोणा पिढीत रुग्णांची सेवा करत असतांना त्यांना कोरोणा आजाराने पिढीत झाल्या होत्या. त्यांना त्रास जानवू लागल्याने त्यांच्या घशातील स्त्रवाची चाचणी केली असता त्यांचा  पॉझिटिव रिपोर्ट आल्यानंतर त्यांना लगेचच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 
उपचार सुरू असतांना त्यांच्या घशातील स्त्रवाच्या पुन्हा चाचण्या केल्या असता त्या निगेटिव्ह आल्याने त्यांना दि. २१ मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला. 

कोरोणाशी दोन हात करून सीमा पगारे घरी येनार असल्याचे परिसरातील नागरिकांना समजताच त्यांच्या सहकर्मचार्यांनी व पोलीस बांधवानी आणि नातेवाईकांनी सोशल डिष्टन पाळत टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन भव्य स्वागत केले.


सौ. पगारे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हनाल्या की, मला मागील२१ वर्षात अनेक प्रकारच्या रुग्णांची सेवा करण्याची मिळाली आणि मी अत्यंत इमानेइतबारे केले, व आता कोरोणा आजारांंच्या रुग्णांवर उपचार करण्याची संधी मिळाली रुग्णांवर परंतू मी स्वतः कोरोणा पिढीत झाले. कोरोणा हा आजार बरा होणारा आजार असून नागरिकांनी घाबरून जान्याचे काही कारण नाही, मुळात या आजाराची लागन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. 

शासनाचे निर्देश पाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नका, सोशल डिष्टन पाळा, मास्कचा वापर करा, घरी रहा सुरक्षित रहा असे म्हणाल्या व माझा कोरंटाइन  पिरेड संपल्यानंतर मला पुन्हा रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी हजार व्हायचे आहे तरी सर्वांनी वरील प्रमाणे काटेकोर नियम पाळला व आपल्या सह आपला परिवार परिसर सुरक्षित ठेवा असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


सीमाताई पगारे यांनी २८ डिसेंबर१९९९ ते ४ जुन २०१६ तब्बल१७ वर्ष नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात परिचारिका म्हणून काम केल्यानंतर त्या नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या मनमिळाऊ स्वभाव असल्याने त्यांची नांदगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षैत्रातील आणि इतर नागरिकांनी फोन करून चौकशी केली आणि पुढील कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top