B.N.N
अरुण हिंगमीरे
बोलठाण, नांदगाव
नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील व्यापारपेठ म्हणून ओळख असलेल्या बोलठाण येथील सर्व दुकाने व व्यवहार दि.२१ मे गुरुवार पासून पुढील तीन दिवस शनिवार पर्यंत कोरोणा या महामारीची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने बंद ठेवण्याचा निर्णय येथील कोरोणा उच्चाटन समितीने घेतला आहे.
या समितीची बैठक येथील ग्रामपंचायत कार्यालयात समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच अनिल रिंढे, सरपंच ज्ञानेश्वर नवले, सदस्य अमित नहार, मच्छिंद्र पठाडे, चंद्रभान जाधव, रफिक पठाण, ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव, व्यापारी प्रतिनिधी उमेश दायमा, जितेंद्र पाटनी, सोमनाथ पवार, मनोज रिंढे, अनिल कायस्थ यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी गणेश शिंदे, विनोद साळवे हे उपस्थित होते.
या प्रसंगी औरंगाबाद जिल्ह्यात कोरोणा या वैश्विक महामारीने मोठ्या प्रमाणात उद्रेक केल्याने व येथून जवळच असलेल्या कन्नड तालुक्यात औरळा, देभेगाव आणि इतर ठिकाणी कोरोणा सदृश आजाराने ग्रस्त रुग्ण आढळून आल्याने तसेच जेऊर आडगाव, निपाणी यासह वैजापूर तालुक्यातील खामगाव, वाकला, अंचलगाव, वळन, बह्ळेगाव इत्यादी गावातील नागरिकांचे बँकेतील, किरणा व कापड दुकाणातील, कृषी सेवा केंद्रामध्ये परिसरातील सर्व शेतकरी व नागरिकांचे व्यवहार येथे व्यापारपेठ आहे.
त्यामुळे येथे दररोज येथे येत असतात बोलठाण हे गाव नाशिक जिल्ह्यातील शेवटचे गाव असल्याने येथून दोन किलोमीटर अंतरावर औरंगाबाद आणि जळगाव हे जिल्ह्याची हाद्द सुरु होते. त्यामुळे कोरोणाची साखळी खंडित करण्यासाठी गुरुवार ते शनिवार तीन दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान येथील उपबाजार समितीतील कांदा मका या पिकांचे निलाव बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यानंतर दि. ३१ मे पर्यंत दररोज सकाळी आठ ते दुपारी आठ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा असलेल्या शासनाच्या निर्देशानुसार दुकाने खुले ठेवणार असून जिल्ह्याबाहेरील नागरिकांना बंदी करण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पोलीस हवालदार रमेश पवार व पोलीस नाईक अनिल गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले. अनिल रिंढे यांनी सांगितले.