औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक,गीतकार, संगीतकार,कथा पटकथा लेखक तथा केंद्रीय पत्रकार संघटनेचे औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष योगेश तुळशीराम मोरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा एमआयडीसी येथील जयकिसान ऍग्रोटेक चे मॅनेजिंग डायरेक्टर मच्छिंद्र भाऊराव नालकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली.तसेच योगेश मोरे यांनी मच्छिंद्र नालकर यांच्या शेतीविषयक इंडस्ट्रीबद्दल माहिती जाणून घेताना मच्छिंद्र नालकर म्हणाले
की,जयकिसान ऍग्रोटेक या कंपनीची स्थापना 2011 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी क्षेत्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांसाठी सतत संशोधन करून तब्बल 147 उत्कृष्ट उत्पादनाची शृंखला तयार करून,यामध्ये पेस्टीसाईड,बायो पेस्टीसाईड,जैविक खते,मायक्रोन्युट्रियंट,वॉटर सोलुबल व बायो स्टीमुलेंट आदी उत्पादने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले आहे.अशी माहिती त्यांनी योगेश मोरे यांना दिली.तसेच योगेश मोरे यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.