देवगांव रंगारी येथे पाण्याच्या हौदात पडुन युवकाचा दुर्दैवी मृत्यु

0


देवगांव रंगारी,
बिंदास न्यूज नेटवर्क
कन्नड,औरंगाबाद . 

स्वतच्या नवीन घराच्या अपुर्ण अवस्थेतील पाण्याने भरलेल्या हौदात युवकाचा पाय घसरून पडुन दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.६ )सकाळी देवगाव रंगारी (ता.कन्नड) येथे उघडकीस आली.या प्रकरणी देवगांव रंगारी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


या बाबत अधिक माहिती अशी की देवगांव रंगारी (ता.कन्नड) येथील सुधाकर बरबंडे यांच्या नवीन घरांचे बांधकाम सुरु आहे

लाॅकडाऊन मुळे त्यांच्या घराचे बांधकाम गेल्या दोन महिन्यांपासून रखडले होते. दरम्यान दोन दिवसापासुन थोडी कामास सुट मिळाल्याने त्यांनी स्थानिक बांधकाम मिस्तरीच्या साह्याने काम सुरु केले होते. मंगळवारी (ता.५) दिवसभर काम चालु होते .

संध्याकाळी काम बंद झाल्यावर सुधाकर बरबंडे याचा मुलगा रमेश बरबंडे (वय २८) यांनी रात्री पर्यंत परिसर स्वच्छ केला.परंतु उशीर झाला तरी मुलगा घरी जेवायला का आला नाही म्हणून आईवडिलांनी त्याची शोधा शोध केली शेवटी एखाद्या मित्राकडे गेला असेल म्हणून दोघीही  झोपी गेले .
(मृत -रमेश बरबंडे) 

 दुसऱ्या दिवशी बुधवारी  सकाळी सहा वाजता नेहमी प्रमाणे सुधाकर बरबंडे यांनी नवीन बांधकामावर पाणी मारण्यासाठी घरातील अपुर्ण अवस्थेत असलेल्या  हौदातुन बादलीने पाणी काढत असतांना त्यांना मुलगा रमेशची एक चप्पल आढळुन आली.

त्यांनी शंकापोटी हौदात डोकावून पाहिले असता मुलगा पाण्यात पडलेला दिसुन आला . घटनेची माहिती शेजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना दिली

पोलिस उपनिरिक्षक शैलेश जोगदंड सह बीट जमादार आप्पासाहेब काळे,दादाराव चेळेकर हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले.आजुबाजुच्या तरूणाच्या सहकार्याने रमेश यास बाहेर काढण्यात आले असता डोक्याला गंभीर मार लागल्याचे दिसुन आले त्यास  ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले .

त्यास  वैदयकिय अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी तपासुन  मृत घोषित केले. दरम्यान उत्तरीय तपासणी साठी हतनुर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला .तेथे डाॅ .गंवाडे यांनी उत्तरिय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

 रमेश यांच्या पश्यात वडील,आई ,एक भाऊ ,एक बहिण,भावजयी असा परिवार आहे शोकाकुल वातावरणात दुपारी बारा वाजे दरम्यान येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले या .प्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top