नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोणाग्रस्तांसाठी केली भरीव मदत

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक

नोटबंदी नंतर अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एकवीस लाख आणि पंतप्रधान निधीला अकरा लाख असा बत्तीस लाखांचा निधी दिला आहे. विशेष म्हणजे ही बॅंक गेली काही वर्षे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे

: कर्जमाफीमुळे वसुली नाही, आचारसंहितेमुळे निधी मिळत नाही, पगार झाले तरी बॅंकेकडे रोकड नसल्याने हाती पैसे मिळत नाही, ही स्थिती असलेल्या नाशिक जिल्हा बॅंक कर्मचाऱ्यांनी आपले दुःख बाजुला ठेवत, गेल्या अनेक महिण्यापासून हाती वेतन मिळत नाही तरीही एक दिवसाच्या वेतनासह मुख्यमंत्री व पंतप्रधान निधीसाठी बत्तीस लाखांची मदत दिली. 


संकटात आपले दुःख बाजुला ठेवत इतरांचे अश्रु पुसणे ही मराठी परंपरा जपलेल्या या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखलेल्या या मोठेपणाचे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व बँकेचे उपाध्यक्ष सुहास आण्णा कांदे यांनी स्वागत करून अभिनंदन केले.


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एकवीस लाख आणि पंतप्रधान निधीला अकरा लाख असा बत्तीस लाखांचा निधी दिला. विशेष म्हणजे ही बॅंक गेली काही वर्षे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. बॅंकेकडे अजिबात रोखता नाही. रोकड नाही.

 त्यामुळे बॅंकेच्या खात्यात पैसे जमा असले तरी खातेदारांना काढता येत नाहीत. कर्मचाऱ्यांना वेतन जमा होते. मात्र त्यांच्या हाती रोख पैसे मिळत नाहीत. या अडचणीतही 'कोरोना' विरोधात आपले योगदान देण्यात ते कमी पडले नाहीत.

 त्यांनी आपले एक दिवसाचे वेतन व अन्य असा बत्तीस लाखांचा धनादेश कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव व सहकाऱ्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे सुपूर्त केला. 

जिल्हा बॅंक अत्यंत अडचणीत आहे. नोटबंदीमुळे या बॅंकेचे २६४ कोटी रुपये जुन्या नोटांच्या स्वरुपात पडून आहेत. रिझर्व्ह बॅंकेने या नोटा बदलून दिलेल्या नाही.

 त्यानंतर राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यात कोणाला कर्जमाफी झाली त्यांचा एव्हढा गोंधळ झाला की बॅंकेची वसुली ठप्प झाली. त्यानंतर अवकाळी पासवामुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची थकबाकी वाढली. 

नव्या सरकारने कर्जमाफी जाहिर केली, त्यात सुमारे एक हजार कोटी रुपये या बॅंकेला मिळणार होते. परंतु जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हे पैसे अडकले. 

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने बॅंकेत रोकडच नाही. या संकटातही बॅंकेच्या कर्मचार्यांनी आपले दुःख बाजुला सारून कोरोनाग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा मोठेपणा दाखवला. 

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व बॅंकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने कोरोना बाधितांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान केअर फंडासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश दिला. 


यावेळी बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर, माजी राज्यमंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, संचालक संदिप गुळवे, नामदेव हलकंदर, परवेज कोकणी, गणपत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सतिष खरे, सरचिटणीस प्रदीप शेवाळे, सुभाष गडाख, बबन गोडसे, वाय.के.पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top