रेड झोनमध्ये येण्यास व जाण्यास पास दिला जाणार नाही -- जिल्हा अधिकारी मांढरे

0



B.N.N
अरुण हिंगमीरे
नाशिक
                                             

जिल्ह्यातील सहा तालुक्यांसह नाशिक महापालिका क्षेत्र, देवळाली कॅन्टोमेंट तसेच येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, निफाड ही सात क्षेत्र रेड झोनमध्ये असल्याने या परिसरातील नागरिकांना येण्यास व जाण्यास कोणत्याही प्रकारचा पास मिळणार नाही.

 तसेच या परिसरातील नागरीकांनी पाससाठी आवश्यक आरोग्य तपासणीकरिता देखील गर्दी करू नये, असे आवाहन  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील नाशिक महापालिका क्षेत्र, देवळाली कॅन्टोमेंट, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, निफाड हे तालुके रेड झोनमध्ये आहेत. 

त्यामुळे येथील नागरिकांना या क्षेत्रातून बाहेर जाण्याची किंवा आत येण्याची कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येणार नाही, असे श्री. मांढरे यांनी कळविले आहे.

 कोणीही परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयांत गर्दी करू नये. तसेच परवानगी मिळविण्यासाठी दवाखान्यांमध्ये आरोग्य तपासणी करण्यासाठी देखील गर्दी करू नये. 

या तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालक्यांतील नागरिकांनी पास मिळविण्यासाठी nashikepass.in/  या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा, असे जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top