केंद्रीय पत्रकार संघटनेच्या कन्नड तालुका जनसंपर्क अधिकारीपदी बापूसाहेब पवार यांची निवड

0
बिंदास न्यूज नेटवर्क 
कन्नड, औरंगाबाद 

  औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शैक्षणिक तथा पञकारीतेत कार्यरत असणारे मुक्त पञकार बापूसाहेब नानासाहेब पवार यांची केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप वि.कसालकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड तसेच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष योगेश मोरे यांनी व जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जोशी यांच्या शिफारशीनुसार शेख आकीब यांना कन्नड तालुका जनसंपर्क अधिकारीपदाचे नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे.



बापूसाहेब पवार हे कन्नड तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक ,पञकारीता, कला आदी क्षेत्रात कार्यरत असून गुणवत्ता आणि कार्यक्षमता पाहून त्यांची नियुक्ती केली आहे ,असे पञात नमूद केले आहे.


या निवडीबद्दल जिल्हाअध्यक्ष योगेश मोरे,उपअध्यक्ष दत्ताञय जोशी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top