प्रा . आनंद निकम, टूनकीकर
निसर्गाने मानवाला किती मर्यादित ताकत दिली आहे हे आजच्या जागतिक संकटाने दाखवून दिले आहेत.
अगदी अनु रेनुचा अभ्यास ,त्याचा वापर आणि त्याचा उपयोग करून घेण्याची क्षमता मानसात असतानाही आज कोरोना अर्थात कोविड 19 वर परिनामकारक औषधि अजून आपल्याला शोधता आलेली नाही, हे मानवाला मान्यच करावे लागेल. अमेरिका , चीन, इटली, फ्रांस, इंग्लैंड आणि आपला भारत ही राष्ट्रे म्हणजे जगाच्या रथाची चाके आहेत! आणि आज याच देशा मधे या आजारने हाहाकार माजवला आहे. खरे म्हणजे जेव्हा आपन चिनच्या बातम्या ऐकत होतो तेव्हा चीन आपल्या मागील जनमातील काहीतरी पाप फेडतोय असे सर्वांना वाटत होते.
भारतात तापमान खुप असते म्हणून हा विषाणु इथे जगूच शकत नाही अशी समजूत आपन एकमेकांना घालत होतो. सामान्य नागरिक सोडा पन काही अभ्यासु लोक असे सांगत होते. आणखी एक गैरसमज होता कि ग्रामीण भागात हा आजार घुसनार नाही, मात्र देशातील अनेक ग्रामीण भागात सुद्धा आता याने आपली पाळ मूळ पसरायला सुरुवात केली आहे. भारतात हा आजार खुप टप्प्या टप्प्याने आलाय. म्हणून आपल्याला तयारी करायला बराचसा वेळ मिळाला. परिणामी सुरुवातिला अतिशय संथ गतिने याचा प्रसार होत होता. मात्र नंतर महाराष्ट्र राज्य आणि मुम्बई येथे देशाच्या 20 % रुग्ण आढळले. याचे मुख्य कारण असे की मुम्बई ही फक्त महाराष्ट्र सारख्या एका राज्याची राजधानी नसून ती आशिया खंडाची औद्योगिक राजधानी आहे. आणि देशाची आर्थिक राजधानी होय . मुम्बई ची तुलना आपन दिल्ली , भोपाल , जयपुर , मद्रास सोबत करूच शकत नाही. देशभरातून मजुर, व्यवसायिक, चाकरमणी, नट नटी, साहित्यिक अशा विविध क्षेत्रातिल लोक इथे स्थाईक आहे.
यात सर्वात जास्त बिकट परिस्थिति मजूर लोकांची आहे.त्यांना धड़ मुंबईत थांबने शक्य नाही आणि बाहेर ही पड़ता येत नाही . अश्या द्विधा मनस्थतित हे लोक सापडले आहेत. ही फक्त मुंबई ची स्थिति आहे असे नाही ग्रामीण भागात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान,केरल मधून खुप लोक कामासाठी आलेले असतात आणि अचानक लॉक डाउन मुळे त्यांना काय करावे उमजेना. राज्य सरकार गेल्या काही दिवसांपासून केन्द्र सरकार ला विशेष रेलवे साठि मागणी करत आहेत. हे सर्वसृत आहे
. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी म्हणाले की मजूर जर आपल्या राज्यात गेले तर तिथे आजार वाढेल . पन मुळात अशा बेभरश्याच्या वातावरणात प्रत्येकाला आपल्या गावी जावे असेच वाटत होते जे योग्य होते. जर केन्द्राने वेळेवर रेल्वे उपलब्ध करुन दिली असति तर काल चा औरंगाबाद जालना मार्गावरिल देशाला धक्का देणारा प्रसंग घडला नसता.
जेव्हा त्या मजूर जनतेला गावी जाण्याची शाश्वती राहिली नाही तेव्हा हे लोंढे बाहेर पडले आहे. हे हतबल मजूर आपल्या चिल्या पिल्ला सोबत रात्रि, पहाटे आणि दिवसा रख रख्त्या उन्हात जीवाची तमा न बाळगता अनवानी पायाने चालत आहे.
परदेशातील श्रीमंतसाठी विशेष विमाने अगदी दररोज येत असताना आपल्या देशातील ह्या गरीब जनतेस आपापल्या राज्यात नेन्या साठी केन्द्राने रेल्वेच्या स्वरुपात ततपरता का दाखविली नाही? याचे कारण एकच होते या गरीबांचा कोणीही आवाज नव्हता.
शेवटी काल 15 लोक मेल्यानंतर त्यांच्या शवांना घेऊन जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडली जात आहे. हे गरीबीचे दुर्दैव म्हणावे लागेल. राज्याने सुद्धा आक्रमक पवित्रा घेऊन काम करने गरजेचे आहे. काही गोष्टी ह्या स्पष्टपने बोलल्या पाहिजे .
आपन सर्व भारतीय आहोत मात्र आपले राज्य महाराष्ट्र आहे ! दुसरयाच्या घरातील आग विज़वित असताना आपली ही सुरक्षा महत्वाची आहे.
आपले पोलिस ,डॉक्टर आणि इतर सेवेतिल प्राणदूत यांची काळजी घेनेही महत्वाचे आहे.