देवगाव रंगारी
बिंदास न्यूज नेटवर्क
औरंगाबाद
-देवगांव रंगारी ता.कन्नड येथील रहिवासी असलेल्या ऋषिकेश अशोक बोचरे या वीर जवानास भारतीय सीमेवरील लेह लदाखमध्ये कर्तव्य बजावत असतांना मरण प्राप्त झाले.
ही माहीती गांवात धडकताच गांवावर शोककळा पसरली आहे.
याबाबत असे की, येथील ऋषिकेश अशोक बोचरे (वय२७)हा भारतीय सैन्यदलात गेल्या सात वर्षांपासून कार्यरत होते.भारत चिन सिमेवरील लेहलदाख येथे कार्यरत होते.
आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना मंगळवारी (ता.१२)वीरमरण प्राप्त झाले.
दरम्यान ऋषिकेश हा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील होता.त्याचे सहा महिन्यापुर्वीच नोव्हेंबर महिन्यात लग्न झाले होते.
लग्नानंतर लाॅकडाऊन सुरु होण्याच्या आधीच तो येथुन रवाना झाला होता.त्याच्या पश्चात आजी,आई, वडील,पत्नी,एक भाऊ,वहिनी,एक बहिण असा परिवार आहे.