Ratnagiri
Bindass news network
Jamir khalpe
तमिळनाडूमधील जवळपास ४५० कामगार आणि विद्यार्थी अडकलेत रत्नागिरीत
लाॅक डाऊनच्या काळातील संयम सुटल्याने कामगारांनी काढला मोर्चा
जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तामिळनाडूमधील कामगार वाचणार होते समस्यांचा पाढा
मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी रोखले, पोलिसांकडून रस्त्यावर उतरलेल्या कामगारांची काढली समजूत
तीन दिवसात अडकलेल्या कामगारांचा तोडग काढण्याचं दिलं आश्वासन
रत्नागिरीमध्ये अनेक परप्रांतीय मजूर लॉक डाऊन मुळे अडकले असून त्यांना आपापल्या गावी जायचे आहे. मात्र या कामगारांना विविध समस्यांशी सामना करावा लागतोय.
शनिवारी या कामगारान्चा संयम सुटला आणि ते कामगार थेट रस्त्यावर उतरले. रत्नागिरीतील साळवी स्टॉप पासून त्यांनी एकत्र येत एक प्रकारे मोर्चाच काढण्यास सुरुवात केली होती.
मात्र रत्नागिरिच्या पोलिसांनी शिवाजीनगर येथे या सर्व कामगारांना रस्त्यावरच अडवले व त्यांची समजुत काढण्यास सुरुवात केली. यावेळी रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व रत्नागिरी शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक अनिल लाड उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे हे कामगार रत्नागिरीत अडकले असून यांना आपापल्या घरी जायचे आहे. अन्नधान्य मिळत नाही.
आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू मिळत नाहित असा पाढा या कामगारांनी पोलिसांसमोर वाचला. तर पोलिसांनी देखील या कामगारांना कायद्याचे पालन करावे अशा सुचना देण्यात आल्या.